खेळ मित्रत्व वाढवतो : महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:17 IST2017-12-18T00:16:17+5:302017-12-18T00:17:33+5:30
खेळ मित्रत्व वाढवतो आणि खेळासाठी आपली टीम तेथे जायला हवी आणि त्यांची टीम आपल्या देशात यायला पाहिजे, असे मत महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने सुरू करण्याच्या मुद्द्यावर मिल्खा सिंग बोलत होते.

खेळ मित्रत्व वाढवतो : महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले मत
पटना : खेळ मित्रत्व वाढवतो आणि खेळासाठी आपली टीम तेथे जायला हवी आणि त्यांची टीम आपल्या देशात यायला पाहिजे, असे मत महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने सुरू करण्याच्या मुद्द्यावर मिल्खा सिंग बोलत होते. अर्धमॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनास मिल्खा सिंग उपस्थित होते. ते म्हणाले, भारत-पाकिस्तानने चांगल्या प्रकारे रहावे. मी आतापर्यंत जेवढा खेळलो त्यावरून हेच सांगू इच्छितो की, खेळांमुळे मैत्री वाढते. भारत-पाकिस्तानमध्ये सामने व्हायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करताना मिल्खा सिंग म्हणाले की, मोदींनी जगात प्रत्येक देशासोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. भारत गरिबीपासून दूर व्हावा, गरिबाला अन्न आणि नोकरी मिळावी, अशी इच्छा मोदींची आहे. दरम्यान, पटना येथील अर्धमॅरेथॉन स्पर्धेत जवळपास ४ हजार धावपटू सहभागी झाले होते.