जि.प.पं.स. सदस्यांनाही हवी वर्षभराची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST2021-08-28T04:17:22+5:302021-08-28T04:17:22+5:30
अमरावती: कोरोना संकटामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितींना मिळणाऱ्या निधीमध्ये कपात करण्याबरोबरच लॉकडाऊनमुळे कामे करण्यात अडचणी आले आहेत. त्यामुळे ...

जि.प.पं.स. सदस्यांनाही हवी वर्षभराची मुदतवाढ
अमरावती: कोरोना संकटामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितींना मिळणाऱ्या निधीमध्ये कपात करण्याबरोबरच लॉकडाऊनमुळे कामे करण्यात अडचणी आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना वर्षभराच्या कालावधीची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्य मधून होत आहे.
जिल्हा परिषद ,पंचायत समिती सदस्य अंमलबजावणी यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र काही बाबतीत या सदस्यांना अन्याय होत असल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी आपल्या सर्कल मधील कामे मार्गी लावण्यासाठी तसेच कोरोना काळात कामे न करता आल्यामुळे सदस्यांना उर्वरित विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी सरकारने किमान वर्षभराची मुदतवाढ द्यावी अशी मागणी आता जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात जोरात रंगत आहे.