जिल्हा परिषद परिसराने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 01:53 AM2020-01-22T01:53:55+5:302020-01-22T01:54:46+5:30

जिल्हा बँकेच्या शाखेलगत असलेल्या खुल्या जागेवर जिल्हा परिषदेतील कर्मचारी व नागरिकांना वाहन पार्क करता येणार आहे. पदाधिकारी व विविध विभागांचे खातेप्रमुख यांची शासकीय वाहने ही आपआपल्या कार्यालयासमोर वा पार्किंगमध्ये उभी केली जातील. प्रत्येक प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

Zilla Parishad campus breathed a sigh of relief | जिल्हा परिषद परिसराने घेतला मोकळा श्वास

जिल्हा परिषद परिसराने घेतला मोकळा श्वास

Next
ठळक मुद्देवाहनास प्रवेशबंदी : अस्ताव्यस्त वाहनांचा विळखा दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांकडून आतापर्यंत आवारात मिळेल त्या जागेवर अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात होती. याचा फटका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाही सहन करावा लागत होता. या पार्किंगला शिस्त लावण्याचे फर्मान जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सोडताच मंगळवारपासून ‘मिनी मंत्रालया’त वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली. यामुळे बरेच कालावधीनंतर या आवाराने मोकळा श्वास घेतला.
जिल्हा परिषदेत आतापर्यंत मिळेल त्या ठिकाणी वाहने लावली जातात. वाहनांची संख्या अधिक झाली आणि एखादा चालक वाहन लावून गेला की, आधीचे वाहन काढणे अवघड होते, अशी स्थिती अनेकदा येते. जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती आणि आरोग्य, बांधकाम, महिला व बाल कल्याण, पशुसंवर्धन आदी विभागांच्या अधिकाऱ्यांच्या दालनापुढे लागणाऱ्या अस्ताव्यस्त तसेच निकामी झालेल्या वाहनांचा फटका पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांनाही सहन करावा लागतो. ही अव्यवस्था सुधारण्याच्या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागामार्फत बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार पार्र्किंग व परिसर स्वच्छतेची अंमलबजावी मंगळवारपासून सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या परिसरात पदाधिकारी व अधिकारी, सदस्य वगळता अन्य वाहने आत आणण्यास मनाई करण्यात आली आहे. परिणामी मंगळवारी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, अभ्यागतांना आपली वाहने पर्यायी ठिकाणी ठेवावी लागली. काहींनी प्रवेशद्वाराला खेटून रस्त्यालगत वाहन उभी केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

मोकळ्या जागेत पार्किंग
जिल्हा बँकेच्या शाखेलगत असलेल्या खुल्या जागेवर जिल्हा परिषदेतील कर्मचारी व नागरिकांना वाहन पार्क करता येणार आहे. पदाधिकारी व विविध विभागांचे खातेप्रमुख यांची शासकीय वाहने ही आपआपल्या कार्यालयासमोर वा पार्किंगमध्ये उभी केली जातील. प्रत्येक प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

Web Title: Zilla Parishad campus breathed a sigh of relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.