‘बॅकलॉग’ परीक्षांचे ‘ए टू झेड’ नियोजन महाविद्यालय स्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:36 IST2020-12-11T04:36:01+5:302020-12-11T04:36:01+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम सत्र वगळता इतर सत्रांच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे संपूर्ण नियोजन महाविद्यालय स्तरावर होणार ...

‘बॅकलॉग’ परीक्षांचे ‘ए टू झेड’ नियोजन महाविद्यालय स्तरावर
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम सत्र वगळता इतर सत्रांच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे संपूर्ण नियोजन महाविद्यालय स्तरावर होणार आहे. २२ ते ३० डिसेंबर दरम्यान परीक्षा होणार असून, त्यांचे नियोजन, मू्ल्यांकन, प्रश्नपत्रिका ‘ए टू झेड’ आदी जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविली आहे.
उन्हाळी २०२० परीक्षेकरिता अंतिम सत्र, अंतिम वर्ष विद्यार्थी वगळून इतर सर्व माजी विद्यार्थी आणि एम.फिल. चे माजी विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. परीक्षा, मूल्यांकन, प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे, परीक्षार्थींचे गुण विद्यापीठाकडे पाठविण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे. १५ ते २० डिसेंबर दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण ऑनलाईन पोर्टलवर आणि कंट्रोल शिट्मध्ये प्रचलित पद्धतीने पाठवावे लागणार आहे. विद्यापीठ केवळ निकाल जाहीर करणार, ही बाब परीक्षा मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.
---------------------
असे आहे परीक्षा पद्धत
- प्रवेशित असलेल्या महाविद्यालयातून देता येईल परीक्षा
- ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने होतील परीक्षा
- असायमेंटमध्ये चार प्रश्नांपैकी दोन प्रश्न सोडवावे लागेल.
- प्रत्येक प्रश्नाला १० गुण राहतील.
- ऑनलाईन परीक्षेला प्राधान्य
- प्रात्यक्षिक गुण निर्धारित वेळेत पाठवावे लागेल.