हॉटेलमध्ये युगुलाची रासलीला
By Admin | Updated: March 13, 2016 00:09 IST2016-03-13T00:09:30+5:302016-03-13T00:09:30+5:30
राजकमल ते गांधी चौक मार्गावरील एका हॉटेलमध्ये रासलीला करताना युवक-युवतीला शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले.

हॉटेलमध्ये युगुलाची रासलीला
शहर कोतवालीची धाड : तळेगाव आष्टीचा तरुण पकडला
अमरावती : राजकमल ते गांधी चौक मार्गावरील एका हॉटेलमध्ये रासलीला करताना युवक-युवतीला शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले. चौकशीनंतर दोघांनाही पोलिसांनी सोडून दिले. मात्र, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. हॉटेलसमोर बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
राजकमल ते गांधी चौक मार्गावरील एका हॉटेलमधील एका खोलीत युवक-युवती असल्याची माहिती शहर कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकून तळेगाव (आष्टी) येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय तरुणासह एका ३० वर्षीय युवतीला ताब्यात घेतले. ही कारवाई सुरु असतानाच शेकडो नागरिक हॉटेलसमोर जमले होते. पोलिसांनी धाड टाकल्याचे पाहून परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी हॉटेलसमोर गर्दी केली. त्यामुळे काही वेळापुरती वाहतूकसुध्दा विस्कळीत झाली होती. कोतवालीचे पोलीस निरीक्षक राधेशाम शर्मा यांच्या नेत्तृत्वात पोलीस शिपाई व महिला पोलीस पथकाने युवक-युवतीला ताब्यात घेऊन शहर कोतवाली ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी करून काही वेळानंतर त्यांना सोडण्यात आले. या घटनेत देहविक्रीचा संशय बळावला होता.