साखर कारखान्याच्या धुरांड्यावर चढून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:18 IST2018-10-24T22:18:19+5:302018-10-24T22:18:38+5:30

शहरातील एका युवकाने येथील अंबादेवी साखर कारखान्याच्या धुरांड्यावरून मंगळवारी रात्री उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह कारखान्याच्या परिसरात बुधवारी आढळला.

Youth suicide in climbing sugar factory | साखर कारखान्याच्या धुरांड्यावर चढून युवकाची आत्महत्या

साखर कारखान्याच्या धुरांड्यावर चढून युवकाची आत्महत्या

अंजनगाव सुर्जी : शहरातील एका युवकाने येथील अंबादेवी साखर कारखान्याच्या धुरांड्यावरून मंगळवारी रात्री उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह कारखान्याच्या परिसरात बुधवारी आढळला.
शहरातील शहापुरा येथील सचिन अर्जुन भोंडे (३४) याने दहीगाव-शेलगाव रोडवरील अंबादेवी साखर कारखान्यामधील धुरांड्यावरून मंगळवारी रात्री उडी घेतली. कारखान्याच्या सुमारे ४० फुटांपर्यंत वाढलेल्या वेली तो कापत गेला आणि तेथून उडी घेतली. त्याचा शोध घेणाऱ्या नातेवाइकांना त्याची दुचाकी रस्त्यावरच सापडली. त्यामुळे कारखान्याच्या आवारात त्याचा शोध घेण्यात आला. यावेळी त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या पश्चात दोन मुली, पत्नी, आई-वडील व भाऊ आहे.
दरम्यान, मृत सचिन भोंडे याची कारखान्यानजीक दहिगाव शिवारात शेती आहे. या शेतीच्या धुºयाचा वाद सुरू असून, गेल्या दोन दिवसांपासून तो चिंतेत होता, असे भाऊ संदीप भोंडे याने अंजनगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Youth suicide in climbing sugar factory