शेंदूरजनाघाट येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST2021-05-28T04:11:17+5:302021-05-28T04:11:17+5:30

चंदू हा बुधवारी सायंकाळी ७ वाजताचे दरम्यान लवकर येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला. घरी न आल्याने त्याचा शोधदेखील ...

Youth commits suicide at Shendoorjanaghat | शेंदूरजनाघाट येथे तरुणाची आत्महत्या

शेंदूरजनाघाट येथे तरुणाची आत्महत्या

चंदू हा बुधवारी सायंकाळी ७ वाजताचे दरम्यान लवकर येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला. घरी न आल्याने त्याचा शोधदेखील घेण्यात आला. दरम्यान, गुरुवारी पहाटे एक शेतकरी लक्ष्मण सावंत यांच्या शेतात निंबाच्या झाडाला कुणीतरी गळफास घेऊन लटकलेले असल्याचे दिसून आले. तो मृतदेह चंदू पंधराम याचा असल्याचे स्पष्ट झाले. नगरसेवक मंगलू पंधराम यांनी पोलिसांना माहिती दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता वरूड येथे हलविण्यात आला. चंदू पंधराम याला चार वर्षांचा मुलगा, पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे. एपीआय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील बायस्कर, देवीदास उईके, अमोल गंधे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Youth commits suicide at Shendoorjanaghat