अमरावतीच्या युवकाने तिसऱ्यांदा पटकावली आॅस्करची बाहुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 06:19 PM2019-04-09T18:19:13+5:302019-04-09T18:19:51+5:30

आॅस्कर अवॉर्ड हे नावच त्याच्या व्यापकतेची साक्ष देते. ही प्रतिष्ठित बाहुली अमरावती येथील पस्तीशीतील तरुणाने तिस-यांदा पटकावली, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे.

The youth of Amravati won the Oscars for the third time | अमरावतीच्या युवकाने तिसऱ्यांदा पटकावली आॅस्करची बाहुली

अमरावतीच्या युवकाने तिसऱ्यांदा पटकावली आॅस्करची बाहुली

googlenewsNext

 - धीरेंद्र चाकोलकर
अमरावती - आॅस्कर अवॉर्ड हे नावच त्याच्या व्यापकतेची साक्ष देते. ही प्रतिष्ठित बाहुली अमरावती येथील पस्तीशीतील तरुणाने तिस-यांदा पटकावली, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. नीरज वसंतराव इंगळे यांनी ‘स्पायडर मॅन - इन्टू द स्पायडर व्हर्स’ या चित्रपटाच्या व्हीएफएक्सच्या कामगिरीसाठी आॅस्कर अवॉर्ड तिसºयांदा पटकावला आहे. 

नीरज इंगळे हे  व्हॅन्कुअर (कॅनडा) स्थित सोनी पिक्चर्स इमेजवर्क्स या चित्रपटांना व्हिज्युअल इफेक्ट्सद्वारे सर्वांगसुंदर बनविणाºया कंपनीमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स डिजिटल कंपोझिटर म्हणून अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासमवेत असलेल्या ४०० जणांच्या  चमूने गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडर मॅन - इन्टू द स्पायडर व्हर्स’ या चित्रपटासाठी व्हिज्युअल इफेक्ट्स निर्माण केले. त्यासाठी त्यांना यंदाचा ‘बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म’ या वर्गवारीत आॅस्कर पुरस्काराचा बहुमान लाभला. नीरज इंगळे यांनी सर्वप्रथम २००८ मध्ये ‘गोल्डन कम्पास’ या चित्रपटासाठी सर्वप्रथम आॅस्कर अवॉर्ड पटकावला. त्यानंतर २०१३ मध्ये आलेल्या ‘लाइफ आॅफ पाय’ या चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी प्रतिष्ठेच्या आॅस्कर अवॉर्डची बाहुली पटकावली. १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५ ब्लॉकबस्टर हॉलीवूड चित्रपटांसाठी काम केल्याची नोंद आहे. 

अमरावती शहरातील राजापेठ परिसरात नीरज इंगळे यांचे मूळ वास्तव्य. त्यांचे वडील वसंतराव इंगळे महावितरणमध्ये कार्यरत होते. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसताना नीरजचा ग्राफिक्सचा छंद जोपासण्यासाठी २००१ मध्ये वडिलांनी त्याला महागडा संगणक घेऊन दिला. त्याच्या साहाय्याने अ‍ॅनिमेशनचे धडे त्याने स्वत: गिरवले आणि मुंबईत या विषयाचा सखोल अभ्यास केला. तत्पूर्वी स्थानिक विद्याभारती महाविद्यालयातून बीसीएस (कम्प्यूटर प्रोग्रामिंग) ही पदवी त्यांनी संपादन केली. बºयाच अडचणींनंतर मुंबई स्थित आर एन्ड एच या कंपनीत त्यांना संधी मिळाली आणि त्यानंतर मागे उलटून पाहिलेच नाही. 
 
प्रेरणादायक प्रवास 
व्हिज्युअल इफेक्ट्स या क्षेत्रात कुठलंही मार्गदर्शन नसलेल्या अमरावती शहरातून आॅस्करच्या हॅट्ट्रिकपर्यंतचा नीरज इंगळे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता या क्षेत्रात वाटचाल करू इच्छिणाºया युवकांना ‘सोहम कन्सल्टंट्स’च्या माध्यमातून मार्गदर्शन देण्याची त्यांची तयारी आहे.

Web Title: The youth of Amravati won the Oscars for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.