फोनवरुन धमकी, "तुमच्या मुलीचे लग्न मोडतो, लग्नात धिंगाणाच घालतो"; विनयभंगाचा गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Published: March 15, 2024 05:43 PM2024-03-15T17:43:26+5:302024-03-15T17:44:23+5:30

मैत्री तोडल्यानंतरही टगेगिरी : ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

Your daughter's marriage breaks up; Threatened by phone arrested in amravati | फोनवरुन धमकी, "तुमच्या मुलीचे लग्न मोडतो, लग्नात धिंगाणाच घालतो"; विनयभंगाचा गुन्हा दाखल

फोनवरुन धमकी, "तुमच्या मुलीचे लग्न मोडतो, लग्नात धिंगाणाच घालतो"; विनयभंगाचा गुन्हा दाखल

अमरावती : माझ्याशीच लग्न कर, अन्यथा लग्नात शिरून प्रेयसीच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची गर्भित धमकी देण्यात आली. १४ मार्च रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी, खोलापुरी गेट पोलिसांनी १४ मार्च रोजी आरोपी अंकुश वसुकार (रा. अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.             

तक्रारीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी एकमेकांचे ओळखीचे आहेत. एकाच परिसरात राहत असल्याने त्या दोघांत लहानपणापासून मैत्रीदेखील होती; पण काही दिवसांपूर्वी तरुणीने आरोपीसोबत मैत्री तोडली. मात्र, ते तो स्वीकारू शकला नाही. दरम्यानच्या काळात तरुणीचे समाजातील एका अन्य मुलाशी लग्न जुळले. ती बाब आरोपीलादेखील लगेचच कळली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी तरुणीची भेट घेऊन तिला लग्न मोडण्याचा सल्ला दिला. त्याने आपल्या जुन्या मित्रत्वाच्या व प्रेमसंबंधांच्या आणाभाका तिला दिल्या. मात्र, आता ते शक्य नाही, आपली केवळ मैत्रीच होती, असे तिने त्याला बजावले. त्यावर माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझ्या तोंडावर ॲसिड टाकून तुला मारून टाकेन, अशी धमकी तिला दिली.

तुमच्या मुलीचे लग्न मोडतो
आरोपी अंकुश एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरुणीच्या वडिलांना मोबाइल काॅल करून तुमच्या मुलीचे लग्न मोडतो. तिचे आणि माझे सोबत फोटो आहेत. ते मुलाकडील लोकांना पाठवितो. तिचे लग्न माझ्यासोबत करा, नाही तर लग्नात येऊन ॲसिड टाकीन व धिंगाणा घालीन, अशा धमक्या दिल्या. तथा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तो त्रास असह्य झाल्याने अखेर तिने खोलापुरी गेट पोलिस ठाणे गाठले.

Web Title: Your daughter's marriage breaks up; Threatened by phone arrested in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.