रंगकाम करणाऱ्या तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST2020-12-13T04:30:03+5:302020-12-13T04:30:03+5:30
नांदगाव पेठ : पोटे फाॅर्मसमोरील गोविंद टॉवर येथे इमारतीचे रंगकाम करणाऱ्या तरुणाचा पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना ...

रंगकाम करणाऱ्या तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू
नांदगाव पेठ : पोटे फाॅर्मसमोरील गोविंद टॉवर येथे इमारतीचे रंगकाम करणाऱ्या तरुणाचा पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. आमृपाल तुळशीराम वर्धे (३२, रा. सायत), असे मृताचे नाव आहे.
आमृपाल वर्धे हा शेतकरी कुटुंबातील असून, शेतीचे काम संपल्याने तो रंगकाम करीत होता. पोटे फाॅर्मसमोर गोविंद टॉवर ही इमारत पूर्णत्वास आली असून, त्याची रंगरंगोटी सुरू आहे. तेथे सकाळी ११ वाजता आमृपालने कामाला सुरुवात केली. अचानक त्याचा पाय घसरल्याने तो खाली काेसळला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने व प्रचंड रक्तस्त्रावामुळे आमृपालचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात हलविला.