प्रभादेवी मंगल कार्यालयाजवळ तरुणाचा भोसकून खून, दिवसभरातील दुसऱ्या खुनाने शहरात खळबळ
By प्रदीप भाकरे | Updated: November 22, 2024 23:25 IST2024-11-22T23:25:07+5:302024-11-22T23:25:41+5:30
उपयुक्त गणेश शिंदे सह एसीपी जयदत्त भवर देखील घटनास्थळी पोहोचले असून श्वान पथक व ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले आहे.

प्रभादेवी मंगल कार्यालयाजवळ तरुणाचा भोसकून खून, दिवसभरातील दुसऱ्या खुनाने शहरात खळबळ
प्रदीप भाकरे, अमरावती : येथील जुना बायपास रोड वरील प्रभादेवी मंगल कार्यालया जवळ एका पस्तीस वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अब्दुल आकीब अब्दुल वहाब (रा. नालसाबपुरा पठाणपुरा चौक अमरावती) असे मृताचे नाव आहे. प्रभादेवी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या एका पान टपरी जवळ अब्दुल आकीब हा उभा असताना दुचाकी ऊन आलेल्या तीन पेक्षा अधिक हल्लेखोरांनी त्याचेवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला.
अब्दुल आखिब याच्या पोटात तथा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अब्दुल आकिब याला रक्तबंबार स्थितीत टाकून तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच राजापेयीचे ठाणेदार पुनित कुलट हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी प्रत्यक्ष दर्शींकडून माहिती घेणे सुरू केले असून अद्याप पर्यंत मारेकऱ्यांचा सुगावा लागलेला नाही. घटनेची माहिती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी तथा पोलीस उपयुक्त गणेश शिंदे तथा सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर यांना देण्यात आली आहे.
उपयुक्त गणेश शिंदे सह एसीपी जयदत्त भवर देखील घटनास्थळी पोहोचले असून श्वान पथक व ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले आहे. पुस्तकाची ओळख अब्दुल आखिब अशी पटल्यानंतर त्यात त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे. विशेष म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास स्थानिक लक्ष्मी नगर येथे 19 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. त्या कुणाला दहा तास उलटत नसतानाही दुसरा खून झाल्याने अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे.