दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:12 IST2021-03-31T04:12:48+5:302021-03-31T04:12:48+5:30

दर्यापूर : कुत्र्याच्या चाव्यावर औषधोपचार करण्यासाठी अमरावती येथे जात असलेल्या युवकाचा दुचाकी अपघातात घटनास्थळी मृत्यू झाला, तर एक जखमी ...

Young man killed in two-wheeler accident | दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

दर्यापूर : कुत्र्याच्या चाव्यावर औषधोपचार करण्यासाठी अमरावती येथे जात असलेल्या युवकाचा दुचाकी अपघातात घटनास्थळी मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. प्रशांत रामदास आसरे (३०, रा. दर्यापूर) असे मृताचे, तर अनूप विनायकराव कुलट (३६) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

प्रशांत आसरे हे सोमवारी दुपारी काही कामानिमित्त येवदा नजीकच्या भुरस रामागड येथे गेले होते. त्याठिकाणी गावातील मोकाट कुत्र्याने त्यांना चावा घेतला. त्यावर दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील औषधोपचार करण्यासाठी दोघे दुचाकी (एम.एच २७ - २८१५) ने संध्याकाळी ७ दरम्यान अमरावती येथे जात असताना, लखापूर फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीचा टायर फुटल्याने अपघात झाला. यात प्रशांत आसरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रशांत हे राज्य परिवहन मंडळात तांत्रिक कर्मचारी म्हणून नोकरीवर होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Young man killed in two-wheeler accident