अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या घोटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:24 IST2018-02-26T16:24:45+5:302018-02-26T16:24:53+5:30
तिवसा तालुक्यात एका २५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटा येथे घडली.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या घोटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: तिवसा तालुक्यात एका २५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटा येथे घडली.
सागर पुरुषोत्तम महिंगे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून, त्याने घोटा शिवारातील शेतात मध्यरात्री झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली व आपली जीवनयात्रा संपवली. तो कुऱ्हा येथील महाविद्यालयात एम.ए.चे शिक्षण घेत होता तसेच घरी शेतीही सांभाळत होता. मागील दोन वर्षांपासून होत असलेल्या नापिकीमुळे बँकेची कर्जफेड शक्य नसल्याने व्यथित होऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. पुढील तपास कुऱ्हाचे ठाणेदार सुनील किणगे यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष चौधरी करीत आहेत.