तू जादूटोणा करते; माझी तीनही मुले मारून टाकली म्हणत विनयभंग, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:08 IST2025-01-29T12:07:11+5:302025-01-29T12:08:17+5:30
Amravati : महिलेला जिवे मारण्याची धमकी; मेळघाट अंधश्रद्धेला शरण

You practice witchcraft; you killed all my three children, rape case registered
चिखलदरा : एका महिलेच्या घरी जाऊन जादूटोणा करते, माझी तीनही मुले मारून टाकली, असे म्हणत व्यक्तीकडून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी ५५ वर्षीय महिलेला देण्यात आली. बोरी येथे सोमवारी हा घटनाक्रम घडला. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
शिवा सुरेश दारसिंबे (२३, रा. बोरी) असे आरोपीचे नाव आहे. २६ जानेवारी रोजी तो गावातीलच जीजी भोगीलाल भुसुम (५५) यांच्या अंगणात दाखल झाला. अश्लील शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. तू जादूटोणा करते. तू माझी तीन मुले मारून टाकली, असे म्हणून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शुभम कुमार, ठाणेदार आनंद पिदुरकरसह कर्मचारी करीत आहेत.
रेट्याखेडाप्रकरणी तत्काळ दखल
तालुक्यातीलच रेट्याखेडा येथे वयोवृद्ध महिलेला जादूटोण्याच्या कथित आरोपावरून रात्रभर दोरखंडाने बांधून मारहाण करीत धिंड काढल्यावरही १८ दिवस दखल घेतली गेली नव्हती. 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्यभरातून या घटनेविषयी तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर प्रकरणात गुन्हे दाखल करीत आरोपींना अटक करण्यात आली होती, हे विशेष.