तुम्हीच तुमचे भाग्यविधाता!
By Admin | Updated: April 11, 2015 00:03 IST2015-04-11T00:03:39+5:302015-04-11T00:03:39+5:30
शेतकऱ्यांनो, केवळ परमेश्वर आणि सरकारवर विश्वास ठेवाल तर तुमचा विकास होणार नाही. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे

तुम्हीच तुमचे भाग्यविधाता!
नितीन गडकरी : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन, भरगच्च आयोजन
अमरावती : शेतकऱ्यांनो, केवळ परमेश्वर आणि सरकारवर विश्वास ठेवाल तर तुमचा विकास होणार नाही. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात, असा मंत्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभादरम्यान शेतकऱ्यांना दिला. ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.
मंचावर ना. प्रवीण पोटे, खा. आनंदाराव अडसूळ, खा. अविनाश पांडे, आ. सुनील देशमुख, आ. अनिल बोंडे, कृषीशास्त्रज्ञ सी.डी.मायी, गिरीश गांधी, सोमेश्वर पुसदकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते.
संकट गंभीर आहे. आस्मानी आणि सुल्तानी संकटही आहे. सरकारं बदललीत तरीही सर्वच संकटं संपत नाहीत. काही संकटं आपल्यामुळेही आहेत. संकटांमुळे हताश होवून आत्महत्या करणे हा पर्याय नाही.