शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे उत्पन्न एकरी दोन क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरविण्याचाही निर्णय घेतला आहे, तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देउत्पादन खर्चही निघाला नाही : पावसाने आणले डोळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : मोठ्या कष्टाने व काळजीने चार महिन्यांपासून जोपासत असलेल्या सोयाबीन या नगदी पिकाने याही वर्षी सरासरी न साधल्याने व सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. तालुक्यात सोयाबीन उत्पादनाची एकरी दोन क्विंटल एवढीच सरासरी लागत असून, लागवडीचा खर्चही यामुळे निघाला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरविण्याचाही निर्णय घेतला आहे, तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांच्या गंज्या पावसाने भिजल्याने होते नव्हते सोयाबीनही खराब झाले. त्यामुळे त्यांना योग्य भाव मिळाला नाही. सोयाबीन, उडीद, मूग हे नगदी पीक समजले जात असल्याने याच पिकांवर शेतकºयांची दिवाळी साजरी होत होती. परंतु या नगदी पिकाने अपेक्षा भंग केल्याने आता शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सोयाबीनसह सर्वच पिके चांगली होती. परंतु सततच्या पावसाने सुरुवातीला उडीद, मूग या पिकांसह सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तालुक्यात सरासरी ७० टक्क्यांच्यावर नुकसान झाले, त्याचा सर्व्हेही झाल्याचे शासनाने सांगितले. परंतु आता त्याची प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. दुसरीकडे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या पिकानंतर कापूस आणि तूर या पिकांवर उर्वरित शेतकºयांच्या अपेक्षा लागून आहेत.विम्याची रक्कम त्वरित मिळावीनगदी पैसे भरून विमा काढला. पीक वाया गेले. सोयोबीनची सरासरी पाहता अनेकांनी सोयाबीन काढलेच नाही. शासनाने सरसकट मदत तर केलीच पाहिजे, शिवाय सोयाबीन व इतर पिकांच्या विम्याची रक्कमही त्वरित मिळावी, यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा