यंदा सव्वा लाख मृदा आरोग्य पत्रिका

By Admin | Updated: March 5, 2017 00:12 IST2017-03-05T00:12:36+5:302017-03-05T00:12:36+5:30

मिनीची आरोग्य तपासणी करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादिकतेत वाढ करणे, ....

This year, one lakh lakh soil health magazine | यंदा सव्वा लाख मृदा आरोग्य पत्रिका

यंदा सव्वा लाख मृदा आरोग्य पत्रिका

शेतकऱ्यांना दिलासा : दोन वर्षांत दोन लाख ३६ हजार 'स्वाईल हेल्थ कार्ड'
अमरावती : जमिनीची आरोग्य तपासणी करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादिकतेत वाढ करणे, यासाठी शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजना राबविण्यात येते. फेब्रुवारीअखेर जिल्ह्यातील एक लाख २५ हजार २७१ मृदा आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्यात. गेल्या दोन वर्षांत दोन लाख ३६ हजार ७२४ मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्याने शेतकऱ्यांना जमिनीचा पोत सुधारून उत्पादनवाढ घेणे शक्य झाले आहे.
माती हे वनस्पतींच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारे एक नैसर्गिक माध्यम आहे. खनिज, सेंद्रिय घटक, पाणी आणि हवा हे जमिनींचे प्रमुख घटक आहे व या घटकांचे पिकांच्या वाढीसाठी प्रमाण एकत्र असते. जमिनीचा अभ्यास आणि त्याचे वर्गीकरण त्याच्या उपयोगीतेनुसार केले जाते. नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद सर्वेक्षण करण्यात येऊन मृदा परीक्षणाद्वारे खतांचा वापर आणि व्यवस्थापन करण्यात येते. पिकांच्या वाढीसाठी जमिनीकडून अन्नांश घेतले जातात. त्या बदल्यात नवीन अन्नांशांचा जमिनीस पुरवठा करणे गरजेचे असते. त्यातून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संकल्पना तयार झाली. जमिनीचे आरोग्य टिकविणे पर्यायाने जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक क्षेत्राचे माती परिक्षण करणे, जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण जाणून घेणे व त्यानुसार नवीन हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी खतांचे प्रमाण निश्चित करता येईल.

शासनाचे शंभर टक्के अनुदान
अमरावती : खतांच्या समतोल वापरासाठी मृद आरोग्यपत्रिका वितरण योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना दर दोन वर्षांनी त्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. फेब्रुवारीअखेर दोन लाख ३६ हजार ७२४ मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. यात शासनाचा शंभर टक्के हिस्सा आहे.

अन्नद्रव्यांचे व्यवस्थापनाने उत्पादकतेत भर
रासायनिक खतांचा बेसुमार वापर कमी करून मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांचा संतुलित वापर व जमिनीचे आरोग्य सुधारणेसाठी जैविक खते व नत्र खतांच्या वापरास पुरवठा करणे व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनेद्वारे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे हा योजनेचा उद्देश आहे.

मृद नमुन्यात या घटकांचे विश्लेषण
जमिनीचा सामू (पीएच), क्षारता (इसी), सेंद्रिय कर्व, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, सुक्ष्म मुलद्रव्यामध्ये उपलब्ध जस्त, तांबे, लोह, मंगल, बोरान आदींचे मृद नमुन्याद्वारे विश्लेषण केल्या जाते व मृदा सुधारणेसाठी विविध अन्नद्रव्यांना ५० टक्के प्रमाणात २५०० रूपये प्रति हेक्टर प्रमाणे आर्थिक सहाय्य मिळते.

असा घ्यावा मातीचा नमुना
बायागती क्षेत्रासाठी अडीच हेक्टरमधून एक व जिरायती क्षेत्रासाठी १० हेक्टरमधून एक नमुना घ्यावा. जीपीएस मोबाईल सुविधाचे माध्यमातून मृद नमुने काढावेत. स्ट्रॅटी फाईड सॅम्पलींग पद्धतीचा अवलंब करून नमुना काढायला पाहिजे.

Web Title: This year, one lakh lakh soil health magazine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.