यंदा सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र
By Admin | Updated: July 18, 2015 00:15 IST2015-07-18T00:15:20+5:302015-07-18T00:15:20+5:30
जिल्ह्यात १५ जुलैअखेर २ लाख ८७ हजार ४५७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

यंदा सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र
कपाशीपेक्षा सव्वा लाख हेक्टरने अधिक : सरासरी क्षेत्राच्या ९८ टक्के पेरणी
अमरावती : जिल्ह्यात १५ जुलैअखेर २ लाख ८७ हजार ४५७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. नियोजित क्षेत्रापेक्षा ९८ टक्के हे पेरणी क्षेत्र आहे. सद्यस्थितीत कपाशीच्या पेरणी क्षेत्राच्या तुलनेत १ लाख २४ हजार ९२९ हेक्टरने अधिक आहे. २३ दिवसांपासून पाऊस नाही. मात्र पाऊस पडल्यानंतर सोयाबीनची क्षेत्रवाढ होणार आहे.
कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी ७ लाख १४ हजार ९५० हेक्टरमध्ये नियोजन केले होते. यापैकी ५ लाख ८९ हजार २१० हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यामध्ये २ लाख ८७ हजार ४५७ हेक्टरमध्ये सोयाबीनचे पेरणी क्षेत्र आहे. सद्यस्थितीत पावसाने २३ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे ६० दिवसांच्या कालावधीत घेतल्या जाणारे मूग व उडीद यासारखे पिके बाद होणार आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक ४० हजार हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आहे. भातकुली ३१ हजार ३४७ हेक्टर, चांदूररेल्वे २३ हजार ८४९ हेक्टर, तिवसा २२ हजार ९१२ हेक्टर, मोर्शी २१ हजार ३८१ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात २२ हजार ७१७ हेक्टर, चांदूरबाजार १७ हजार ३२३ हेक्टर, अचलपूर १४ हजार २१० हेक्टर, अंजनगाव सुर्जी १६ हजार ६ हेक्टर, दर्यापूर १५ हजार ९१८ हेक्टर, वरूड ८५० हेक्टर, अमरावती ३१ हजार २१० हेक्टर, चिखलदरा १४ हजार १७५ हेक्टर, धारणी तालुक्यात १५ हजार ८१० हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे.