यंदा ५० हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र कमी !

By Admin | Updated: April 26, 2016 23:57 IST2016-04-26T23:57:08+5:302016-04-26T23:57:08+5:30

सलग तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसात खंड व नैसर्गिक आपत्ती यामुळे दरवर्षी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त होत आहे.

This year, the area of ​​soybean is less than 50 thousand hectares! | यंदा ५० हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र कमी !

यंदा ५० हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र कमी !

महिन्यावर आला खरीप : २९ हजार हेक्टरने होणार कपाशीची क्षेत्रवाढ
गजानन मोहोड अमरावती
सलग तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसात खंड व नैसर्गिक आपत्ती यामुळे दरवर्षी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त होत आहे. या तुलनेत तूर व कपशीने थोडा फार शेतकऱ्यांना साथ दिली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात किमान ४९ हजार २१४ हेक्टरने सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात कमी होणार असल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. या तुलनेत कपाशीच्या पेरणीक्षेत्रात २८ हजार ८३४ हेक्टरने व तूर, मूग, उडीद यांच्या पेरणी क्षेत्रात २० हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून वेळेवर दाखल होऊन समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असली तरी शेतकरी मात्र या अंदाजावर विश्वास ठेवण्यास धजावला नाही. यापूर्वीचे हवामान खात्यांचे अंदाज वार कौलमध्ये आहे.
जिल्ह्यात खरिपासाठी ७ लाख १५ हजार हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे व ४ लाख १५ हजार ८५८ शेतकरी संख्या आहे. पावसाच्या १२० दिवसांत जिल्ह्यात ८१५ मिमी. सरासरी पाऊस पडायला पाहिजे. मात्र, मागील दोन वर्षांत पावसाने पेरणीपश्चात हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे समीकरण पार कोलमडले होते. गतवर्षी खरिपासाठी ६ लाख ७८ हजार ७५ हेक्टरमध्ये पेरणी झाली. पेरणीची ही ९४.८४ टक्केवारी होती यामध्ये ३ लाख ९ हजार २१४ हेक्टरमध्ये सोयाबीन १ लाख ८६ हजार ६१५ हेक्टरमध्ये कपाती व १ लाख २ हजर हेक्टरमध्ये तुरीचे पेरणी क्षेत्र होते. या वर्षासाठी कृषी विभागाने पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये सोयाबीनचे २ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. कापूस २ लाख १५ हजार ५०० हेक्टर, तूर १ लाख २० हजार हेक्टर, मूग ३५ हजार हेक्टर, ज्वारी ३० हजार हेक्टर, उडीद १२ हजार ५०० हेक्टर, ८ हजार ४५० हेक्टर व ईतर पिके १३ हजार ५०० हेक्टर पेरणी क्षेत्राची शक्यता आहे.

पेरणी क्षेत्रात वाढीची शक्यता
यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने पीकवार व तालुकानिहाय क्षेत्र प्रस्तावित केले आहे. जून महिन्यात वेळेत मान्सूनचे आगमन व समाधानकारक पाऊस राहिल्यास सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात २० हजाराने वाढ होऊ शकते तसेच मूग व उडीद यांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊ शकते.

दर्यापूर तालुक्यात खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र प्रस्तावित
खरीप २०१६ करिता कृषी विभागाने अमरावती तालुक्यात ५४,३४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. भातकुली ४९,१३० हेक्टर, नांदगाव ५८,४५० हेक्टर, तिवसा ४३ हजार ७४० हेक्टर, चांदूर रेल्वे ४३,३४० हेक्टर, धामणगाव ५० हजार ५१० हेक्टर, मोर्शी ६१,१४० हेक्टर, वरुड ४८ हजार ८० हेक्टर, चांदूरबाजार ५८ हजार ५४० हेक्टर, अचलपूर ५७ हजार ९५० हेक्टर, अंजनगाव ४४ हजार ५५० हेक्टर, धारणी ५२ हजार ३८० हेक्टर व चिखलदरा तालुक्यात ३० हजार ५२० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे.

नांदगाव तालुक्यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन
जिल्ह्यात सोयाबीनसाठी २ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले. यामध्ये सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्र नांदगाव तालुक्यात आहे. अमरावती ३२ हजार भातकुली २८ हजार, तिवसा २३ हजार, चांदूर रेल्वे २२ हजार, धामणगाव २० हजर, मोर्शी २३ हजार, वरुड ४ हजार, चांदूर बाजार १८ हजार, अंजनगाव १५ हजार, दर्यापूर १२ हजार, धारणी १८ हजार व चिखलदरा तालुक्यात १२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.

Web Title: This year, the area of ​​soybean is less than 50 thousand hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.