शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत यवतमाळ संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 19:59 IST

अमरावती संघ ठरला उपविजेता, अटीतटीची ठरली लढत

अमरावती : विदर्भस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत यवतमाळ संघ अजिंक्य ठरला. अंतिम सामन्यात दोन गोलने आघाडी घेत यवतमाळ संघाने अमरावती संघाला मात दिली. यात अमरावती संघ उपविजेता राहिला. रविवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास रंगलेला हा सामना बघण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती व अमरावती हॅण्डबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या मैदानावर ६ व ७ फेब्रुवारी रोजी डॉ पंजाबराव देशमुख स्मृती चषक विदर्भस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विदर्भातून १४ संघ सहभागी झाले होते. सर्वांना नमवूृन अमरावती (ए) व यवतमाळ (बी) संघात अंतिम सामना रंगला. अटीतटीच्या या समान्यात यवतमाळ संघाने २०-१८ गोलने आघाडी घेतली. यामध्ये दोन गोल अधिक घेऊन यवतमाळ विजेता ठरला. तेज बनसोड हा मॅन ऑफ द सिरीज ठरला. सामन्याचे उद्‌घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कार्यकारिणी सदस्य तथा प्राचार्य व्ही. जी ठाकरे होते.

स्वागताध्यक्ष प्राचार्य स्मिता देशमुख होत्या. विजेता संघाला संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांच्या हस्ते पारितोषिक व स्मृतिचिन्ह व रोख देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले, प्राचार्य स्मिता देशमुख, अंजली ठाकरे, भाऊ बेलसरे, नंदकिशोर कांडलकर, नितीन चांगोले, स्पर्धा संयोजक सुभाष गावंडे उपस्थित होते.