सोशल मीडियावरही यशोमती ठाकूर, बच्चू कडू आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:01 IST2021-08-07T05:00:00+5:302021-08-07T05:01:02+5:30

राज्य मंत्री बच्चू कडू यांचे जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींच्या तुलनेत सर्वाधिक फॉलोअर्स असल्याचे दिसून आले. फेसबुकप्रमाणेच ट्विटरवर अकाउंट असून, त्यावरही ते सक्रिय आहेत. मात्र, ट्विटरपेक्षा फेसबुकचा वापर दिसत आहे. ना. बच्चू कडू यांचे फेसबुकवर ७.१३ लाख, तर ट्विटरवर २ लाख ६७ हजार फॉलोअर्स आहेत. 

Yashomati Thakur, Bachchu Kadu on social media too | सोशल मीडियावरही यशोमती ठाकूर, बच्चू कडू आघाडीवर

सोशल मीडियावरही यशोमती ठाकूर, बच्चू कडू आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या आशाआकांक्षा वाढीस लागल्या आहेत. मात्र, मुंबई, दिल्लीची वारी करताना मतदार संघाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील आठ आमदार व खासदारांनी फेसबूक, ट्विटर, इंन्स्टाग्रामचा वापर वाढविला आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स भक्कम आहेत. फेसबूक, ट्विटर हे लोकप्रतिनिधींसाठी जनसंपर्काचे साधन ठरत आहे.
याचाच फायदा जिल्ह्यातील आठही विधानसभा क्षेत्रातील आमदार व खासदार करून घेत आहेत. आमदार,  खासदारांच्या वैयक्तिक अकाउंटसोबतच पेजही तयार केलेले आहे. ते अपडेट केले जात असल्याने फॉलोअर्सही वाढत आहे. 

तीन आमदार ट्विटरवर नाहीत
अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे हे नागरिकांसोबत भेट, संवादासाठी  ट्विटरचा वापर करीत नाही. मात्र, फेसबूकच्या माध्यमातून ते सक्रीय असतात. कोरोना काळात जनसंपर्काचे साधन म्हणून या तिनही आमदारांनी फेसबूकवरुन संपर्क साधला. 

बच्चू कडूंचे सर्वाधिक फॉलोअर्स
राज्य मंत्री बच्चू कडू यांचे जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींच्या तुलनेत सर्वाधिक फॉलोअर्स असल्याचे दिसून आले. फेसबुकप्रमाणेच ट्विटरवर अकाउंट असून, त्यावरही ते सक्रिय आहेत. मात्र, ट्विटरपेक्षा फेसबुकचा वापर दिसत आहे. ना. बच्चू कडू यांचे फेसबुकवर ७.१३ लाख, तर ट्विटरवर २ लाख ६७ हजार फॉलोअर्स आहेत. 

यशोमती ठाकूर यांचे ट्विटरवर तीन अकाऊंट
पालकमंत्री यशोमती ठाकूर फेसबूक, ट्‌विटरचा वापर करुन नागरिकांशी सतत संपर्कात असतात. त्यांचे ट्विटरवर तीन अकाऊंट असून, ५५ हजार फॉलोअर्स आहेत. फेसबूक पेजवर १ लाख १८ हजार ९३६ फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर ५३ हजार ६०० तर ईस्ट्राग्रामवर २७ हजार फॉलोअर्स आहेत.

खासदारांचे फेसबूक अकाऊंट जोरात
लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या नवनीत राणा सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांचेही फेसबूक पेज, फेसबूक अकाउंटसोबतच ट्विटर अकाउंटही असून नियमित अपडेट केले जात आहे. एका फेसबूक अकाउंटवरील माहितीनुसार २ लाख ९० हजार  फॉलोअर्स आहेत; तर ट्विटर अकाउंटवर तब्बल १२ हजार ५० फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर खासदारांचे अधिक फॉलोअर्स आहेत. ईस्टाग्रामवरही त्या सक्रीय आहेत.

 

Web Title: Yashomati Thakur, Bachchu Kadu on social media too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.