चूक तलाठ्याची, भुर्दंड शेतकऱ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:54+5:30
तलाठ्याचा ‘इगो’ दुखावल्यावर काय होते, याची प्रचिती नुकतीच बेंबळा येथील जगतराव चºहाटे यांना नुकतीच आली. चºहाटे यांच्याकडे ३ एकर १७ गुंठे कोरडवाहू शेत आहे. त्यांनी त्या शेतात तूर व सोयाबीन पेरले. मात्र, तलाठ्याने त्यांच्या पेरेपत्रकावर संपूर्ण कपाशीची नोंद केली. त्यामुळे पेरेपत्रकावरील नोंद दुरुस्त करण्यात यावी, असे विनंतीपत्र २४ जानेवारी रोजी तहसीलदारांना दिले.

चूक तलाठ्याची, भुर्दंड शेतकऱ्याला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एखाद्या साध्यासरळ प्रकरणात एखादी कलम टाकून अडसर निर्माण केला जातो. त्याला ग्रामीण भाषेत ‘ग्यानबाची मेख’ असे संबोधले जाते. तीच मेख तलाठीही मारतात. हा सार्वत्रिक अनुभव. फेरफार असो वा सात-बारावरील नावांची नोंद, तलाठ्यांनी कधीकाळी मारलेली मेख दुरुस्त होत नाही, असे जुने-जाणते सांगतात. अशीच एक मेख बेंबळा येथील तलाठ्याने मारली. त्याचा भुर्दंड शेतक ºयाला बसला आहे. शेतात तूर आणि सोयाबीन असताना पेरेपत्रकावर कपाशीची नोंद करण्यात आली. त्यामुळे त्या शेतकºयाला त्याच्या शेतातील तूर नाफेडला विकणे दुरापास्त झाले आहे.
तलाठ्याचा ‘इगो’ दुखावल्यावर काय होते, याची प्रचिती नुकतीच बेंबळा येथील जगतराव चऱ्हाटे यांना नुकतीच आली. चºहाटे यांच्याकडे ३ एकर १७ गुंठे कोरडवाहू शेत आहे. त्यांनी त्या शेतात तूर व सोयाबीन पेरले. मात्र, तलाठ्याने त्यांच्या पेरेपत्रकावर संपूर्ण कपाशीची नोंद केली. त्यामुळे पेरेपत्रकावरील नोंद दुरुस्त करण्यात यावी, असे विनंतीपत्र २४ जानेवारी रोजी तहसीलदारांना दिले. दोन-तीन दिवस प्रतीक्षाही केली. नाफेडच्या तूर नोंदणीसाठी पेरेपत्रकावर तुरीची नोंद बंधनकारक असल्याने त्यांनी ही बाब प्रहारचे शहरप्रमुख चंदू खेडकर यांना सांगितली. त्यावर दर्यापूरच्या तहसीलदारांनी संबंधित तलाठ्याला पेरेपत्रकावरील पेºयाची नोंद अचूक करण्याचे आदेश दिले. प्रकरण पुन्हा तलाठ्याच्या कोर्टात आले. त्यावर तलाठ्याने काय करावे, तर त्याने चक्क चºहाटे यांना १०० रुपयांच्या मुद्रांकावर शेतात कोणत्या पिकाचा पेरा आहे, हे लिहून आणण्यास सांगितले. वृद्ध शेतकरी तहसीलदारांकडे तक्रार करतो, हे तलाठ्यास रुचले नाही. त्याने पेरेपत्रकावर कपाशीचे क्षेत्रफळ १.३७ हेक्टर असे कायम ठेवत, त्यात रबीमध्ये ४७ गुंठे तूर व ०.९० हेक्टरवर चण्याचा पेरा नव्याने दाखविला. पुन्हा एकदा प्रकरण तहसीलदारांकडे गेले. मोका पाहणी करून तहसीलदारांनी शेतात सोयाबीन व तूर असल्याला दुजोरा दिला. चºहाटे यांच्या शेतात मूलत: जी पिके होती, त्याचीच नोंद करण्याचे आदेश संबंधितांना देतो, असे ११ फेब्रुवारी रोजी सांगितले. तहसीलदार योगेश देशमुख यांनी पाहणी केल्याच्या तीन दिवसानंतरही पेरेपत्रकावरील नसलेल्या कपाशीची नोंद ‘जैसे थे’ आहे.
तहसीलदारांच्या दूरध्वनीनंतर नाफेडमध्ये तूर नोंदणी झाली. मात्र, कपाशीची नोंद पेरेपत्रकावर ‘जैसे थे’ आहे. ती चूक दुरुस्त करण्यात यावी. संबंधित तलाठ्याविरुद्ध कारवाई व्हावी. तलाठ्याच्या चुकीमुळे माझी नाहक ससेहोलपट होत आहे.
- जगतराव चºहाटे
शेतकरी, बेंबळा