शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

...तर शांतीलाल वाचला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:20 IST

एएसआय शांतीलाल पटेल यांची हत्या होण्यापूर्वी गस्तीदरम्यान संशयास्पद स्थितीत आढळलेल्या आरोपींना संबंधितांनी पोलीस ठाण्यात दिवस उजाडेपर्यंत थांबवले असते, तर पटेल यांचे प्राण वाचले असते. पण, तसे झाले नाही. यामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : एएसआय शांतीलाल पटेल यांची हत्या होण्यापूर्वी गस्तीदरम्यान संशयास्पद स्थितीत आढळलेल्या आरोपींना संबंधितांनी पोलीस ठाण्यात दिवस उजाडेपर्यंत थांबवले असते, तर पटेल यांचे प्राण वाचले असते. पण, तसे झाले नाही. यामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.रात्र गस्तीदरम्यान पोलिसांना कुणी संशयास्पद आढळले, तर त्याची चौकशी करण्याचा, सर्वांगीण माहिती घेण्याचा व यात समाधान झाले, तर सोडण्याचा आणि समाधान न झाल्यास त्याला पोलीस ठाण्यात नेऊन डिटेन करण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून पोलीस विभागात आहे. शांतीलाल पटेल यांच्या हत्याप्रकरणात हा प्रघातच दुर्लक्षित केला गेला. शांतीलालची हत्या करणारे आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. यातील दोघांवर अचलपूर पोलीस ठाण्यात, तर एकावर जिल्ह्याबाहेर गुन्हे दाखल आहेत. अचलपूर व परतवाडा पोलीस ठाण्यांमध्ये केवळ पाच किलोमिटरचे अंतर आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांची माहिती असायला हवी. या माहितीचे आपसात आदानप्रदानही व्हायला हवे.परतवाडा पोलीस ठाण्यात मागील वर्षी २८३ गुन्हे घडलेत. यात ३७ घरफोड्या आणि नऊ जबरी चोऱ्या आहेत, तर यावर्षी जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान १८४ गुन्हे नोंदले गेले आहेत. यात जबरी चोºया नऊ आणि घरफोड्या २४ आहेत. चोरट्यांची हिंमत वाढली आहे. नागरिक हवालदिल झाले आहेत. जुळ्या नगरीत चिडीमारीचे प्रमाण वाढले आहे. मुलींची टिंगल उडवित आहेत. या चिडीमारांमुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत. यावर पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याच कमी आहे; काय करावे, असे उत्तर पुढे केले जाते. उत्तर काहीही असो, पण दररोज घडणाऱ्या घटनांकडे बघितल्यास जुळ्या नगरीत पोलिसांचा वचक राहिलेला नाही. पोलीसच सुरक्षित नाही मग नागरिकांचे काय?विशेष पोलीस महानिरीक्षकांची एएसआय पटेल यांच्या घरी भेटतिन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडीपरतवाडा : शांतीलाल पटेल हत्याप्रकरणातील तिन्ही आरोपींना अचलपूर न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी पटेल कुटुंबीयांची भेट घेतली.एएसआय शांतीलाल पटेल (५५, रा. गोवर्धन विहार, परतवाडा) यांची हत्या करणारे केदार घनश्याम चरपटे, नितीन खोलापुरे, नयन मंडले या तिघांना बुधवारी दुपारी अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तात बुधवारी दुपारी २.३० वाजता हजर करण्यात आले. न्यायालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. आरोपींनी वापरलेल्या लोखंडी सळाखीची जप्ती पोलीस करणार आहेत. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी बुधवारी येथे येऊन पटेल कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर विश्रामगृहात ठाणेदारांसह पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. पर्यावरण विभागाचे योगेश खानझोडे व माजी आमदार केवलराम काळे यांनीही तरवडे भेट घेऊन परिसरातील समस्यांवर चर्चा केली.आमचे पोलीस पती जिवंत परत येण्याची हमी घ्याएसडीओ पुढे पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा टाहोपरतवाडा : शांतीलाल पटेल यांच्या हल्लेखोरांना फाशी झालीच पाहिजे. आमचे पोलीस पती सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस तैनात असतात. ते जिवंत घरी परत येण्याची हमी घ्या, असा आक्रोश पोलीस कर्मचाºयांच्या पत्नींनी अचलपूर उपविभागीय अधिकाºयांपुढे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता केला. सर्व पोलीस कुटुंब दहशतीखाली असल्याची जाणीव त्यांना करून देण्यात आला.पोलीस कर्मचाºयांच्या सौभाग्यवतींचे म्हणणे एसडीओ व्यंकट राठोड यांनी निवांतपणे ऐकून घेतले. गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईबाबत शासनाला तसा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संगीता दहीकर, मीना भुसूम, मीरा धांडे, मीरा सलामे, कलावती चिमोटे, कविता तोटे, गंगा कोल्हेकर, सोनिया मावस्कर, कमला बेठेकर, मीना बेलसरे, प्रमिला कासदेकर, शशी मावस्कर, इंदू तोटे, संतुलाल बेठे, महादेव कासदेकर, अशोक अखंडे, रामप्रसाद चिमोटे, दादाराव पळसकर, दाजी धुर्वे, शंकर बेठे, विक्की मवासी, रमेश मवासी आदी पोलीस कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनतर्फे निवेदन देण्यात आले.गुंडांचा तडीपारीचा प्रस्ताव तसेच पटेल हत्याप्रकरणातील आरोपींवर कठोर शासनाचा अहवाल पाठविला जाणार असल्याचे एसडीओ राठोड म्हणाले.