शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चिटफंड घोटाळा १.८० कोटींवर! आरोपी मिलन पोपट पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 17:52 IST

अमरावतीतील घोटाळ्याची एकूण रक्कम १ कोटी ८० लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तपास यंत्रणा असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याच्या या व्याप्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.

ठळक मुद्देबडोद्याहून रिक्तहस्ते परतले पोलीस विश्वास कमावून केला विश्वासघात

अमरावती : चिटफंड कंपनी उघडून येथील गुंतवणूकदारांना कोट्यवधींनी लुबाडणाऱ्या मिलन पोपट या सूत्रधाराला अटक करण्यासाठी पोलीस गुजरातेतील बडोदा येथे गेले खरे, मात्र तेथूनही तो पसार झाल्याने पोलिसांना रिक्तहस्ते परतावे लागले. दरम्यान, या प्रकरणातील घोटाळ्याची एकूण रक्कम १ कोटी ८० लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तपास यंत्रणा असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याच्या या व्याप्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.

रुख्मिणीनगरमध्ये चिटफंड कंपनी उघडून येथील मिलन पोपट व एका महिलेने गुंतवणूकदारांची तब्बल ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार २२ जानेवारी रोजी राजापेठ पोलिसांनी नोंदवून घेतली होती. त्या तक्रारीवरून मिलन हिंमतलाल पोपट (३५, फ्लॅट नं. १०४, श्रीनिवास अपार्टमेंट, पुनम इलेक्ट्राॅनिक्सजवळ, अंबिकानगर, अमरावती) व एक महिला अशा दोघांविरुद्ध विविध कलमांसह चिटफंड ॲक्टचे कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल केला.

प्रकरण आर्थिक स्वरूपाचे असल्याने २३ जानेवारी रोजी त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्या शाखेने मिलन पोपटचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले असता, ते गुजरातला मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेंडे हे गुजरातमधील बडोदा शहरापर्यंत जाऊन आले. मात्र, शातीर असलेला मिलन पोपट वारंवार लोकेशन बदलत असल्याने व मोबाईल स्विच्ड ऑफ ठेवत असल्याने पोलिसांना त्याचा मागमूस लागू शकला नाही.

...अशी होती गुंतवणूक

मिलन पोपट व एका महिलेने रुक्मिणीनगरस्थित एका मंगल कार्यालयाच्या बाजूने स्वत:चे चिटफंड कार्यालय उघडले. तेथे शहरातील ४५० जणांकडून १ हजार रुपये प्रति महिना अशी रक्कम पाच वर्षांसाठी स्वीकारली गेली. त्या योजनेला ३ वर्ष ९ महिने पूर्ण झाल्यानंतर पोपटचे बिंग फुटले. तक्रारी सुरू झाल्या. चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोपट याने या कालावधीत गुंतवणूकदारांना ४५ बक्षिसेदेखील दिली. लकी ड्रॉमध्ये नंबर न लागल्यास ६० महिन्याचे ६० हजार रुपये परतावा देण्याची हमी त्याने दिली होती.

चिटफंड कंपनी उघडून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुंतवणूकदारांची बयाने नोंदविली जात आहेत. सूत्रधाराच्या शोधासाठी ‘टीम इओडब्ल्यू’ गुजरातला जाऊन आली.

शिवाजी बचाटे, प्रमुख, आर्थिक गुन्हे शाखा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसMONEYपैसा