उपजिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST2020-12-04T04:34:47+5:302020-12-04T04:34:47+5:30
मोर्शी : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात ‘जागतिक एकता सामाजिक जबाबदारी’ हे घोषवाक्य घेऊन कार्यक्रम घेण्यात ...

उपजिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिन
मोर्शी : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात ‘जागतिक एकता सामाजिक जबाबदारी’ हे घोषवाक्य घेऊन कार्यक्रम घेण्यात आला. मातेपासून बाळाला होणाऱ्या संसर्गाला प्रतिबंध या विषयावर एमओ विवेक दुर्गे, तर डॉ. नरेश रावलानी यांनी वैयक्तिक सुरक्षेवर मार्गदर्शन केले. संचालन श्रीकांत गोहाड व आभार प्रदर्शन सुवर्णा श्रीराव यांनी केले. या कार्यक्रमाला अधिपरीचारिका पाटील, मोरे, आशिष पाटील, विनय शेलूरे उपस्थित होते. वैद्यकीय अधिक्षक विजय कळसकर यांचे मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.