तळेगाव ते महिमापूर मार्गाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:59+5:302021-04-22T04:13:59+5:30
तळेगाव दशासर : तळेगाव ते महिमापूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अर्ध्यावर थांबल्याने या मार्गावर अपघाताची शक्यता वाढलेली आहे. या रस्त्याची ...

तळेगाव ते महिमापूर मार्गाचे काम रखडले
तळेगाव दशासर : तळेगाव ते महिमापूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अर्ध्यावर थांबल्याने या मार्गावर अपघाताची शक्यता वाढलेली आहे. या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. येथून सुपर एक्स्प्रेस हायवेपर्यंत मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर दूरवर गिट्टी पसरलेल्या अवस्थेत आहे.
--------------
मजुरांअभावी शेती अडचणीत
कावली वसाड : काही वर्षांचा अनुभव पाहता यंदा मात्र उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. मजूरांचादेखील चांगलाच भाव वाढला आहे. इतर वेळी फक्त दूरवध्वनीवर संपर्क साधल्यास शेकडो मजूर येत असत. परंतु तालुक्यातील बरेच शेतकरी या मजुरांना आणण्यासाठी गेले असता हे मजूर येण्यास तयारच होत नाहीत. त्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
---------------
तालुकावासीयांना संवर्धन राखीव क्षेत्राची प्रतीक्षा
राजुरा बाजार : अभयारण्याऐवजी महेंद्री जंगल ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित करून तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश वनविभागाला देऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात नसल्याने महेंद्री संरक्षित जंगलाचे घोडे कुठे अडले, असा वरूड तालुकावासीयांचा सवाल आहे.
----------------
बाभळीची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर
भातकुली: तालुक्यातील शेतशिवारात अजूनही मोठमोठी झाडे आहेत. मात्र, झाडांवर वास्तव्य करणाऱ्या माकडांचा कळप शेतातील पिकांचे मोठे नुकसान करतो. त्यामुळे अनेक शेतकरी धुऱ्यावरील मोठमोठी बाभळीची झाडे पेटवून वन्यप्राण्यांच्या त्रासापासून मुक्ततेचा पर्याय अवलंबवित आहेत.
-----------
अंजनगाव बारी-बडनेरा मार्गाची डागडुजी केव्हा?
अंजनगांव बारी : येथून रायसोनी विद्यापीठ ते राम मेघे इंजिनिअरिंग कॉलेज ते पुढे जुनी वस्ती बडनेरा हा मार्ग पुर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्याला खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गाची डागडुजी केव्हा, असा संतप्त सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.
--------------
चांदूरबाजार शहरात पुन्हा अतिक्रमण
चांदुर बाजार : पालिका प्रशासनाने बाजारपेठेतील अतिक्रमण पूर्णत: मोकळे केले. या कारवाईने बाजारपेठ मधील अरुंद रस्ते रुंद झाले. मात्र या कार्यवाहीनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, वाढणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला कुठलेही नियोजन नाही. नव्याने अतिक्रमण थाटण्यात आले आहे.
------------
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
अंजनगाव सुर्जी : चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील मुºहा ते विहिगावदरम्यान घडली. या अपघातात प्रफुल लोखंडे (रा. मुºहादेवी) व नितीन दही हे जखमी झालेत. १५ मार्च रोजी रहिमापूर पोलिसांनी चारचाकीचालकाविरूद्ध गुन्हा नोेंदविला. २३ डिसेंबर २०२० रोजी हा अपघात घडला होता.
-----------------
सत्तीपुºयात महिलेला मारहाण
अंजनगाव सुर्जी : येथील सत्तीपुरा भागात एका ३० वर्षीय महिलेला दगडो मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. १५ मार्च रोजी रात्री ही घटना घडली.अंजनोव सुर्जी पोलिसांनी याप्रकरणी युनुसशहा जलिलशहा (अजीजपुरा) व मजीतखा अजीजखा (उस्माननगर) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------------
नांदगावात बापलेकाला मारहाण
नांदगाव खंडेश्वर: येथील देवराव शिरस्कार (६२) व शाम शिरस्कार या बापलेकाला मारहाण करण्यात आली. १५ मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी हर्षद देवराव शिरस्कार याचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हा त्याच्या आईला ५०० रुपये मागून तिचेशी वाद घालत असताना समजाविण्यास गेले असता हा प्रकार घडला.
----------------
चिंचोली गवळी येथे मायलेकाला मारहाण
मोर्शी : तालुक्यातील चिंचोली गवळी येथेसुनील पाटील (४३) व त्यांच्या आईला मारहाण करण्यात आली. दारूच्या नशेत शिवीगाळ करणाºया आरोपींना हटकले असता १५ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी निलेश जवने, मुकेश जवने, उमेश जवने व राजकुमार जवने (सर्व रा. चिंचोली) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
-------------------------