ब्रिटीशकालीन पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडीटचे काम थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 00:17 IST2016-09-02T00:17:57+5:302016-09-02T00:17:57+5:30

जिल्हयात लहान- मोठे एकूण ७४४ पूल असून त्यापैकी २७ पूल हे ब्रिटीशकालीन आहेत. यापूलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडीट करावे,

The work of the structural audit of the bridge in the British Bridge was in the cold storage | ब्रिटीशकालीन पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडीटचे काम थंडबस्त्यात

ब्रिटीशकालीन पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडीटचे काम थंडबस्त्यात

जिल्हयात ७४४ लहान-मोठे पुल : प्रशासनाचे दुर्लक्ष
संदीप मानकर अमरावती
जिल्हयात लहान- मोठे एकूण ७४४ पूल असून त्यापैकी २७ पूल हे ब्रिटीशकालीन आहेत. यापूलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडीट करावे, असे शासनाचे निर्देश असतानाही २७ पूलाचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्यासंदर्भाचे काम थंडबस्त्यात पडले आहेत.
महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर प्रशासन जागृत झाले आहे. नुकतेच यासंदर्भात पूणे येथे मागील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यशाळाही पार पडली कार्यशाळेतही पूलाचा स्ट्रक्चरल आॅडीट करुन शासनाला त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सेमाडोह येथील सिपना नदीवर पूल नादुरुस्त असल्याचे अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात पूढे आले आहे. येथे अपघातग्रस्त वळण रस्ता असल्यामुळे वनविभागाची जमीन भुसंपादीत करुन हा वळण रस्त्याचे सरळीकरण करुन पूल बांधण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासनाला सादर होणार आहे. जिल्हयात ब्रिटीशकालीन लहान १५ तर मोठे १२ पूल आहे. त्यापैकी तीन पूलाचे काम करण्याची तातडीने गरज आहे. ६० ते २०० मीटर पर्यंत उंचीचे हे पूल असल्याची महिती पूढे आली आहे. एका महिन्यात यासंदर्भाचा स्ट्रक्चरल आॅडीटचा अहवाल शासनाकडे सादर करावा लागणार आहे. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सद्यस्थितीत यासंदर्भाचे कुठलीही नियोजन दिसून आले नाही. त्यामुळे पून्हा पूर परिस्थीती उध्दभवल्यास मोठी हाणी व अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The work of the structural audit of the bridge in the British Bridge was in the cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.