शासकीय कार्यालयांत मेणबत्तीने कार्य
By Admin | Updated: July 24, 2014 23:37 IST2014-07-24T23:37:36+5:302014-07-24T23:37:36+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा शहराचा विद्युत पुरवठा मागील चार दिवसांपासून खंडित असल्याने अनेक शासकीय कार्यालयांमध्ये मेणबत्तीवर कार्य सुरू आहे.

शासकीय कार्यालयांत मेणबत्तीने कार्य
आज चौथा दिवस : चिखलदऱ्याचा विद्युत पुरवठा खंडित
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा शहराचा विद्युत पुरवठा मागील चार दिवसांपासून खंडित असल्याने अनेक शासकीय कार्यालयांमध्ये मेणबत्तीवर कार्य सुरू आहे.
चिखलदऱ्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार व वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी महाकाय वृक्ष उन्मळून पडील आहेत. काही भागातील मार्गावरील वाहतूक अद्यापही बंदच आहेत. चिखलदरा तालुक्या येणाऱ्या विद्युत वाहिनीवर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे विद्युत तारा तुटून पडल्याने संपूर्ण तालुक्यातील वीज गूल झाली आहे. अशात शहरातील अनेक घरांचा व शासकीय कार्यालयांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी इन्व्हर्टरसुद्धा बंद पडले आहेत.
पूर्व मेळघाट वन विभागाच्या चिखलदरा कार्यालयात चक्क मेणबत्तीवर कर्मचाऱ्यांना शासकीय कामे करावी लागत आहे. विद्युत वितरण कंपनीतर्फे हेकेखोरपणा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अल्प असल्याची सबब पुढे करून शासकीय कार्यालये व नागरिकांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)