महिलांची स्कुटर रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:10 IST2018-03-09T00:10:52+5:302018-03-09T00:10:52+5:30

 जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला अधिकारी, पदाधिकरी यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका व विविध विभागातील कर्मचाºयांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता भव्य स्कुटर रॅली काढली.

Women's Scooter Rally | महिलांची स्कुटर रॅली

महिलांची स्कुटर रॅली

 जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला अधिकारी, पदाधिकरी यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका व विविध विभागातील कर्मचाºयांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता भव्य स्कुटर रॅली काढली. यामध्ये महिलांचा सन्मान वाढविण्याचा संदेश देण्यात आला. याशिवाय महिला सक्षमीकरण, बेटी बचाव यासारख्या फलकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. ही रॅली जिल्हा परिषदेतून गर्ल्स हायस्कूलमार्गे इर्विन चौक, बसस्थानक मार्गे जिल्हा परिषदेत पोहोचून रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये महिला व बालकल्याण सभापती वनिता पाल, सदस्या वासंती मंगरोळे, पुजा हाडोळे, अर्चना मेश्राम, पूजा आमले सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Women's Scooter Rally