शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

८४० ग्रामपंचायतीत जलस्रोतांची निगा राखणार महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST

जिल्हा परिषदेच्यावतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एच टू एस  व्हायरल खरेदी करण्यात येणार आहे. या किटमध्ये लहान काचेच्या बाटलीत स्त्रोताचे पाणी  भरून ही बाटली उन्हापासून दूर ४८ तासात ठेवण्यात येणार आहे. बाटलीतील पाण्याला पिवळा रंग येतो. तो आहे तसाच राहिल्यास पिण्यास योग्य, अन्यथा काळा झाल्यास पाणी पिण्यास अयोग्य आहे. या पाणी स्रोताचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत देण्यात येणार आहे.

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  ग्रामविकासात महिलांचा सहभागी कितपत, हा प्रश्न ५० टक्के आरक्षण मिळाल्यानंतरही केला जातो. तथापि, या प्रश्नाला प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या जबाबदारीतून महिलांनी दिला आहे. आता नवी जबाबदारी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची आहे. जिल्ह्यात ८४० ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ७ हजार ८७१ पाण्याच्या स्रोतांची जैविक तपासणी फील टेस्ट किटद्वारे केली जात आहे. त्यात महिलांचा सहभाग राहणार आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एच टू एस  व्हायरल खरेदी करण्यात येणार आहे. या किटमध्ये लहान काचेच्या बाटलीत स्त्रोताचे पाणी  भरून ही बाटली उन्हापासून दूर ४८ तासात ठेवण्यात येणार आहे. बाटलीतील पाण्याला पिवळा रंग येतो. तो आहे तसाच राहिल्यास पिण्यास योग्य, अन्यथा काळा झाल्यास पाणी पिण्यास अयोग्य आहे. या पाणी स्रोताचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत देण्यात येणार आहे. दूषित आलेल्या नमुन्यांचा अहवाल आरोग्य सेवकांमार्फत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे. 

जि.प. पुरविणार किटजिल्ह्यात ८४० ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत ७८७१ पाण्याची जैविक फिल्ड टेस्ट किट पुरविण्यात येणार आहे. याद्वारे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची पाणी गुणवत्ता तपासणी केली जाईल. पाण्याची शास्त्रोक्त पद्धतीने गुणवत्ता तपासणी कशी करावी, स्रोतांची निगा कशी राखावी व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम पाणी गुणवत्ताविषयक तपासणी फिल्ड टेस्ट किटचा वापर कसा करावा, त्याचा वापर करून कशी तपासणी केली जाते, तसेच हे किट कसे हाताळावे याबाबत माहिती दिली जात आहे.

महिलांचा सहभागजैविक पाणी स्रोत तपासण्यासाठी प्रथमच महिलांचा सहभाग घेण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ५ महिलांची निवड करण्यात आली आहे. 

जैविक तपासणी म्हणजे काय?पिण्याच्या पाण्यामध्ये काही जैविक घटक जिवाणू, विषाणू आहेत का, हे पाहण्यासाठी होणाऱ्या तपासणीस  जैविक तपासणी  म्हणतात. जैविक तपासणी साधारणत: तीन महिन्यांतून एकदा केली जाते.

 

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत