शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी सरसावल्या धारणीतील महिला

By admin | Updated: September 14, 2014 23:47 IST

स्थानिक वॉर्ड क्र. ३ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारुचा व्यवसाय फोफावल्याने याविरुध्द महिलांनी एल्गार पुकारला आहे. दारुबंदीसाठी सुमारे ५० महिलांनी पोलीस ठाण्यात धडक देऊन अवैध व्यावसायिकांवर

धारणी : स्थानिक वॉर्ड क्र. ३ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारुचा व्यवसाय फोफावल्याने याविरुध्द महिलांनी एल्गार पुकारला आहे. दारुबंदीसाठी सुमारे ५० महिलांनी पोलीस ठाण्यात धडक देऊन अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले. याची गंभीर दखल घेत स्वत: ठाणेदार शरद इंगळे यांनी लगेच सायंकाळी सुधाकर चव्हाण, प्रीती ताठे यांना सोबत घेऊन वॉर्डातच बैठक घेतली. गाऱ्हाणी ऐकली व भविष्यात असे प्रकार घडणार नाही याची हमी घेत जनतेला पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. १३ सप्टेंबर रोजी ग्रा.पं. सदस्य कमल ठाकूर यांच्या नेतृत्वात सुमारे ५० महिलांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यांनी वॉर्ड क्र. ३ मध्ये सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीवर निर्बंध घालण्याबाबतचे लेखी निवेदन ठाणेदार शरद इंगळे यांना दिले. ठाणेदारांनी लगेच सर्व महिलांना 'सायंकाळी वॉर्डात येतो. आपण येथे आपली बाजू नि:संकोचपणे मांडा', असे आवाहनही केले. लोकांनीही ठाणेदारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारी विहिरीजवळ तत्काळ बैठक भरविली. यात ठाणेदारांची उपस्थिती पाहता लोकांनी मनमोकळेपणाने आपली व्यथा मांडली. पोलीस आपल्या पाठीशी आहे. आपण दारुबंदीच्या दिशेने उचललेल्या पावलास आम्ही पूर्ण सहकार्य करु, अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करताना आपले सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. युवापीढी दारुच्या आहारी गेल्याने अनेक घरे दारुमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. अलीकडच्या काळात व्यसनामुुळे सात जणांनी आत्महत्या केल्याची माहिती याप्रसंगी कमल ठाकूूर यांनी दिली.(तालुका प्रतिनिधी)