शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूविक्रेत्याला महिलांनी झोडपले

By admin | Updated: September 22, 2014 23:11 IST

नजीकच्या खेड या गावातील अवैध दारुविक्रेत्याला गावकरी महिलांनी बांधून ठेवले व बेदम मारझोड केली. याप्रकरणी दारुविक्रेता आणि मारझोड करणाऱ्या महिलांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आहेत.

खेड येथील घटना : दारूविक्रेत्यासह महिलांवरही गुन्हे मोर्शी : नजीकच्या खेड या गावातील अवैध दारुविक्रेत्याला गावकरी महिलांनी बांधून ठेवले व बेदम मारझोड केली. याप्रकरणी दारुविक्रेता आणि मारझोड करणाऱ्या महिलांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आहेत.२० सप्टेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. खेड गावात अवैधरित्या दारुविक्री होत असल्याची ओरड आहे. तशा तक्रारी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकासोबतच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मोर्शी पोलीस ठाण्यातर्फे सातत्याने धाडी टाकून अवैध दारूविक्रीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतरही दारुविक्री सुरू असल्याची ओरड आहे. त्यामुळे दारुबंदीच्या निर्धाराने गावातील काही महिला सक्रीय झाल्या. २० सप्टेबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास गावातील महिलांनीदारु विकणाऱ्या ओंकार मनोहरे याला १०० रुपये किमतीच्या २ लीटर दारुसह पकडले. त्याला जबर मारहाण केली आणि बांधून ठेवले. यावेळी घटनास्थळी मोठया प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर मोर्शीचे सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक बावनकर, हेकाँ प्रभाकर पाचघरे, देविदास शेंडे, नापोकॉ मनोज टप्पे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बांधून ठेवलेल्या जखमी ओंकार मनोहरेची सुटका केली आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुध्द दारुबंदी कायद्याच्या कलम ६५ (ड) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. महिलांच्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या ओंकार मनोहरे याला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओंकार मनोहरे याच्या तक्रारीवरुन त्याला बेदम मारझोड करणाऱ्या प्रभा वानखडे, सरला तंबाखे, शकुनी पाटील, विमला तंबाखे यांच्या विरुध्द पोलिसांनी भादंविच्या कलम ३४२, ३२३, ३२४, ५०४ (३४) प्रमाणे गुन्हा नोंदविला असून तपास सुरू केला आहे. गावात दारु पिऊन येणाऱ्यांविरुध्द सुध्दा महिलांनी एल्गार पुकारल्याची चर्चा आहे. महिलांच्या आक्रमकतेचा दबक्या स्वरात काहींनी विरोधही केला.