शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शिरजगाव बंड येथे महिलेची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:00 AM

पोलीस सूत्रांनुसार, संगीता विकास झटाले (४५, रा. शिरजगाव बंड) असे मृत महिलेचे नाव आहे. शेजारी राहणारी महिला घरात रक्तबंबाळ स्थितीत पडली असल्याची माहिती शिरजगाव बंड येथील प्रशांत कुरळकर यांनी चांदूर बाजार पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार उदयसिंह सोळंके यांनी कर्मचारी विनोद इंगळे, प्रशांत भटकर, दत्ता वानखडे यांच्यासह घटनास्थळ गाठले. संगीता झटाले यांच्या पोटावर धारदार शस्त्राचे सहा वार आढळून आले.

ठळक मुद्देमारेकरी अज्ञात : पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कबेलोरा (चांदूर बाजार) : तालुक्यातील शिरजगाव बंड येथील एका ४५ वर्षीय विवाहितेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.पोलीस सूत्रांनुसार, संगीता विकास झटाले (४५, रा. शिरजगाव बंड) असे मृत महिलेचे नाव आहे. शेजारी राहणारी महिला घरात रक्तबंबाळ स्थितीत पडली असल्याची माहिती शिरजगाव बंड येथील प्रशांत कुरळकर यांनी चांदूर बाजार पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार उदयसिंह सोळंके यांनी कर्मचारी विनोद इंगळे, प्रशांत भटकर, दत्ता वानखडे यांच्यासह घटनास्थळ गाठले. संगीता झटाले यांच्या पोटावर धारदार शस्त्राचे सहा वार आढळून आले. त्या रक्तबंबाळ स्थितीत मृतावस्थेत आढळून आल्या. ही घटना दुपारी १ ते १.३० च्या सुमारास घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. संगीता यावेळी घरी एकट्याच होत्या. त्यांचे पती विकास हे शेतात, मुलगा वाघोलीला, तर मुलगी शाळेत गेली होती. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी मृताच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक तेजस्विनी गिरसावळे करीत आहेत.मारेकरी कोण? गावात दहशतभरदिवसा आणि भरवस्तीत संगीता झटाले यांचा खून करण्यात आला. त्यांचा रक्तरंजित मृतदेह पाहून ग्रामस्थांची बोबडी वळली. घटनास्थळावरील दृश्य थरकाप उडविणारे होते. एखादा मारेकरी दिवसाढवळ्या घरात शिरतो काय अन् विवाहितेच्या पोटावर सहा वार करून तिला संपवतो काय, हे सारेच ग्रामस्थांसाठी अनाकलनीय होते. एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात घोळत होते. घटनाजन्य पुरावे न आढळल्याने संगीता झटाले यांचा मारेकरी शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून दोन्ही मुलांचा आक्रोश मन थिजविणारा होता.

टॅग्स :Murderखून