शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

पद भरतीशिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘केआरए’ अशक्य

By admin | Updated: May 30, 2015 00:31 IST

महाराष्ट्र राज्यातील शासकीय, जिल्हा परिषद, मनपा तसेच निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांचे कामाचे ....

बैठक : ओबीसी असोसिएशनचा विरोध, वेतनवाढ-पदोन्नतीवर होणार परिणामअमरावती : महाराष्ट्र राज्यातील शासकीय, जिल्हा परिषद, मनपा तसेच निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांचे कामाचे मूल्यमापन करुन त्यांचे आॅडिटही केल्या जाणार आहे. कामाचे उद्दिष्ट पूर्ण करुन संबंधित कर्मचारी, अधिकारी यांना ‘केआरए’ प्राप्त करावा लागणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केलेली आहे. त्याचा परिणाम कर्मचारी अधिकारी यांची वेतनवाढ व पदोन्नतीवर होणार आहे. यासंदर्भात ओबीसी असोसिएशन आॅफ गव्हमेंट अ‍ॅन्ड सेमी गव्हमेंट एम्प्लाईज (महाराष्ट्र राज्य) यांनी कॅम्प येथे राज्याचे अध्यक्ष लतीश देशमुख यांचे निवासस्थानी तातडीची बैठक रविवारी बोलाविण्यात आली. बैठकीला असोसिएशनचे राज्यातील प्रतिनिधी हजर होते. तसेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष व्ही.एन. देवीकर सुद्धा उपस्थित होते. ओबीसी असोसिएशनचे राज्याध्यक्ष लतीश देशमुख यांनी आपले विचार मांडताना म्हटले की, राज्य शासनाच्या विविध कार्यालयात दीड लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून एका एका कर्मचारी, अधिकारी यांचेकडे दोन ते तीन कार्यभार आहेत. राज्य शासनातील प्रत्येक कर्मचारी, अधिकारी दोन ते तीन अतिरिक्त कार्यभाराने दबलेला आहे, अशा परिस्थितीत ‘केआरए’ लागू करुन कर्मचाऱ्यांचे कामाचे मूल्यमापन होत असेल तर ही राज्यशासनाची कर्मचाऱ्यांवर लोकशाहीमध्ये दडपशाही ठरणार असून त्याचा असोसिएशनचा तीव्र विरोध राहील.‘केआरए’ राज्य शासकीय कर्मचार, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी यांना लावू देणार नाही, त्यासाठी संघर्ष करण्यास संपूर्ण राज्यातील कर्मचारी, अधिकारी यांनी सज्ज राहण्याची घोषणा केली. राज्य शासन कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करीत असून त्यांचे शोषण करीत आहे. केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देणे आवश्यक असून अजूनही ३५ महागाई भत्त्याचे हप्ते दिले नाही. सरेंडर रजा बंद केली. बोनस बंद केले. किरकोळ राजा १२ वरुन ८ वर आणल्या. सन २००५ पासून पेंशन योजना बंद केली. सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वर्षे अजूनही केलेली नाही. इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण बाबीची पूर्तता करणेस राज्यशासन सअसमर्थ ठरलेले आहे. या सर्व बाबीची पूर्तता व अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय, जिल्हा परिषद, मनपा, नगरपरिषद व इतर सर्व निमशासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी एकत्रित येण्याचे आव्हान असोसिएशनचे राज्य अध्यक्ष लतीश देशमुख यांनी केलेले आहे. सभेला असोसिएशनचे सरचिटणीस बबनराव जवंजाळ, राज्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीकर, सरचिटणीस पवार, जयप्रकाश वाढुरकर (अकोला) प्रा. आंबेकर (बुलडाणा) दादाजी सोनवणे (नाशिक), नंदू बुटे (यवतमाळ), राजेंद्र देशमुख (नागपूर), अरुण कळंबे (अमरावती) उपस्थित होते. (प्रतिनिधी)