शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

दलालांच्या मदतीशिवाय परवाना मिळणे कठीणच !

By admin | Updated: March 14, 2015 00:40 IST

नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक विभागाने तालुका ठिकाणी महिन्यातून एकदा परवाना देण्यासाठी शिबिर सुरु केले आहे.

सुमित हरकुट चांदूरबाजार नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक विभागाने तालुका ठिकाणी महिन्यातून एकदा परवाना देण्यासाठी शिबिर सुरु केले आहे. या शिबिरात फक्त १०० वाहनचालकांनाच परवाना देण्यात येतो. यामुळे ग्रामीण भागातील दलालांनाही सुगीचे दिवस आले आहे.वाहतूक विभागाचा नवीन निर्णयानुसार तालुकास्थळी महिन्यातून एकदाच वाहन परवाना शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार तालुक्यातील शेकडो विनापरवाना वाहन चालक या शिबिराची वाट पाहत ताटकाळत बसतात. मात्र पहिल्या ६० दुचाकी चालकांना तर ४० चारचाकी वाहन चालकानाच परवाना देण्यात येतो. वाहतूक विभागाचा या तुघलिकी निर्णयामुळे अनेक इच्छुकांना रात्रीपासूनच शिबिराच्या ठिकाणी तळ ठोकून बसावे लागते. अनेक इच्छुक दलालांना भेटून आधीच आपले वाहन परवाना मिळविण्याबाबत ‘सेटींग’ करतात.वाहतूक विभाग आयुक्त महेश झगडे यांच्या निर्णयानुसार जिल्हा वाहतूक विभागाचे कार्यालय काही प्रमाणात दलालमुक्त झाले असले तरी परवाना काढणाऱ्याची संख्या ही शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. त्यामुळे मोजक्या १०० वाहनचालकांना परवाना वाटप करणे म्हणजे दलालांचा तसेच ड्रायव्हींग शाळांच्या माध्यमातून गेल्याशिवाय परवाना मिळणे कठीणच आहे. शहरात दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढ होत आहे. अशातच ७२ ते ७५ टक्के वाहनचालकांकडे वाहन चालवायचा परवानासुध्दा नाही. अनेक युवा वर्ग विनापरवाना सर्रास वाहने फिरवित आहेत. मात्र या विनापरवाना वाहनचालकांना कोणतीही अडवणूक केली जात नसल्याने अवैध दुचाकी, चारचाकी वाहनचालक तीन सीट, चार सिट बसवून सर्रास ‘धूम’ स्टाईल धावताना आढळतात.शहरातील जिल्हा परिषद विश्रामगृहावर महिन्याकाठी एका शिबिराचे आयोजन केले होते. येथे परवाना घेण्याकरिता वाहनधारक ग्रामीण भागातून रात्रीपासूनच येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र रांगेत लागूनसुध्दा अनेकांना आल्या पावली परतावे लागले. आयुक्तांचा आदेशाला तिलांजली देत दलालांचा माध्यमातून आलेल्या इच्छुकांना निश्चित परवाना मिळतोच. मात्र भर उन्हात रांगेत उभे राहूनही परवाना न मिळत असल्यानेही तालुक्यात विनापरवाना वाहनचालकांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे.