शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

जादा भाडे आकारल्यास परवान्यावर टाच; खासगी बसेसवर आरटीओची नजर

By गणेश वासनिक | Updated: November 7, 2023 16:29 IST

खासगी बस वाहतूकदारांच्या ठिकठिकाणच्या बुकिंग कार्यालयाच्या परिसरात लावण्याची सक्ती

अमरावती : सणासुदीच्या काळात मुंबई, पुणे किंवा इतर ठिकाणाहून ये- जा करणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवाशांची गर्दी जास्त असल्याचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्स संचालक तिकीट बुकिंग हाऊसफुल असल्याची शक्कल लढवितात. उत्सव कॅश करण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करून जादा तिकीट दर प्रवाशांकडून आकारतात. मात्र, आता अशा खासगी बसेसवर आरटीओंची करडी नजर असून, आकस्मिक तपासणी मोहीम राबविली जात आहे.

वाहतुकदारांकडून जादा भाडेवाढ आकारण्यात येण्याऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी खासगी कंत्राटी बसेस ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासून किलोमीटर प्रमाणे खासगी बस मालकांनी आकाराव्याचे महत्तम भाडे दराबाबतचा तक्ता व हेल्पलाइन नंबर विहित नमुन्यात लावण्याबाबत खासगी बस वाहतूकदारांच्या ठिकठिकाणच्या बुकिंग कार्यालयाच्या परिसरात लावण्याची सक्ती करण्यात आली आहे.आरटीओची असणार करडी नजर

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक व अधिकारी अनपेक्षितपणे खासगी प्रवासी बसेसच्या कार्यालयांना भेटी देऊन ऑनलाईन आरक्षित केलेल्या तिकिटांचा तपशील त्यांच्या संगणकावर तपासून पाहणार असून ऑफलाइन आरक्षित केलेल्या तिकिटाची खातरजमा करेल. जेणेकरून बुकिंग फुल्ल असल्याचे दर्शविणाऱ्या बुकिंग चालकांच्या शक्कलींना चाप आणि आळा बसेल. तसेच खासगी प्रवासी बसेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत आता आरटीओ अधिकारी संवाद साधून त्यांच्याकडून जादा भाडे आकारणी केल्याबाबतची खातरजमा करणार आहे.जादा भाडे आकारल्यास येथे करा तक्रार

शासन निर्णयाच्या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बस मालकाविरुद्ध जास्त प्रवासी भाडेवाढ आकारल्यास हेल्पलाइन क्रमांक ०२२ ६२४२६६६६ व rto.27-mh@gov.in या संकेतस्थळावर प्रवाशांनी तक्रार करावी. प्रवाशांनी प्रवासाचे स्वतःचे तिकीट जोडल्यास यावर तत्काळ प्रभावीपणे कार्यवाही करता येईल.

शासन निर्णयानुसार कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडेकर आकारल्यास सदर परवानाधारकाविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ८६ व इतर अनुषंगिक तरतुदीस अनुसरून कार्यवाही करण्यात येईल.

- राजाभाऊ गीते, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसroad transportरस्ते वाहतूक