शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

वादळी पाऊस : छत उडाले; १५०० कोंबड्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:10 IST

अचलपूर-परतवाड्यासह लगतच्या परिसरात गुरुवारी झालेल्या वादळी पावसात अचलपूर नगरपालिकेच्या अध्यक्ष सुनीता फिस्के यांच्या घरावरील छत उडाले. वादळाचा वेग जास्त असल्यामुळे घरावरील लोखंडी अँगलसकट सर्व टीन उखडून उलटे झालेत.

परतवाडा : अचलपूर-परतवाड्यासह लगतच्या परिसरात गुरुवारी झालेल्या वादळी पावसात अचलपूर नगरपालिकेच्या अध्यक्ष सुनीता फिस्के यांच्या घरावरील छत उडाले. वादळाचा वेग जास्त असल्यामुळे घरावरील लोखंडी अँगलसकट सर्व टीन उखडून उलटे झालेत.काकडा येथील प्रमोद गिरी यांच्या शेतातील कुक्कुटपालन शेड व भिंत कोसळल्यामुळे यात १५०० कोंबड्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यात त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळात परतवाडा-अमरावती मार्गावर भुगावलगत एमएच ४० एन- ८६३९ क्रमांकाच्या एसटी बसवर अचानक झाड कोसळले. बसवर झाड कोसळताच मोठा आवाज झाला आणि बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. घाबरलेल्या स्थितीत प्रवाशी बसबाहेर पडलेत. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.परतवाडा शहरातील एलआयसी चौकात मोठे कडुनिंबाचे झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. जुळ्या शहरांच्या आसमंतात काळे ढग शुक्रवारीही होते. अधून-मधून हलक्या सरींनी मान्सूनची वर्दी दिली.

टॅग्स :Rainपाऊस