अमरावतीत वादळी पाऊस, बडनेरा कोरडा
By Admin | Updated: October 4, 2014 23:18 IST2014-10-04T23:18:49+5:302014-10-04T23:18:49+5:30
शहरात शुक्रवार व शनिवारी अचानक पावसाने हजेरी लावली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अमरावतीत धुवांधार पाऊस तर अवध्या आठ किलोमीटरवर असणाऱ्या बडनेऱ्यात कोरडे वातावरण पाहायला मिळाले.

अमरावतीत वादळी पाऊस, बडनेरा कोरडा
अमरावती : शहरात शुक्रवार व शनिवारी अचानक पावसाने हजेरी लावली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अमरावतीत धुवांधार पाऊस तर अवध्या आठ किलोमीटरवर असणाऱ्या बडनेऱ्यात कोरडे वातावरण पाहायला मिळाले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहरातील शेकडो झाडे कोलमडून पडली. त्यामुळे जिल्ह्यातील आपादकालीन कक्ष पुन्हा सक्रिय झाला आहे.
काही दिवसांपासून वापसामुळे उकाडा निर्माण झाला होता. तापमान ३५ डिग्री सेल्सिअसवर गेले होते. मात्र विजयादशमीची तयारी सुरु असताना अचानक शुक्रवारी दुपारी १.३५ मिनिटांनी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अर्धातास जनजीवन विस्कळीत झाले होते. २० मिनीट बरसलेल्या पावसाने व वादळाने शहरातील अनेक परिसरात झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच शहरातील अनेक घरावरची टिने उडाली, शहर जलमय झाले होते. व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी वर्ग पुन्हा त्रस्त झाल्याचे दिसून येत होत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रविनगर परिसरातील एका विद्यालयसमोर एक झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याचप्रमाणे शहरातील शेगाव नाका परिसरात मुख्य ट्रॅक्टरवर झाड कोसळले. दसरा मैदान ते भुतेश्वर मंदिरदरम्यान मार्गावर तीन झाडे कोलमडून पडली.
बेलपुरा परिसरात मोठ्या वृक्षांची फांदी कोसळली. सातखिराडी, प्रशांत नगर, बजरंग टेकडी, नीलम हॉटेलसमोर झाड कोसळले, तसेच नवाथेनगर येथील शितला माता मंदिराजवळील टीनपत्रे उडून गेली. अशाप्रकारे अनेक ठिकाणी वादळी पावसामुळे नुकसान झाल्याने अनेकांना फटका बसला आहे.