तपोवनातील मुलींना हलविणार ?

By Admin | Updated: December 23, 2014 22:55 IST2014-12-23T22:55:51+5:302014-12-23T22:55:51+5:30

तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या १२२ अनराधार, अनाथ मुलींच्या आयुष्याला तेथे गंभीर धोका असल्याच्या दिशेने बाल कल्याण समितीचे मंथन सुरू झाले आहे. समितीच्या बहुतांश

Will move girls in Tapovan? | तपोवनातील मुलींना हलविणार ?

तपोवनातील मुलींना हलविणार ?

मंथन : मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बालकल्याण समिती गंभीर, निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब !
अमरावती : तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या १२२ अनराधार, अनाथ मुलींच्या आयुष्याला तेथे गंभीर धोका असल्याच्या दिशेने बाल कल्याण समितीचे मंथन सुरू झाले आहे. समितीच्या बहुतांश सदस्यांनी या विचाराला अनुकूलता दर्शविल्यामुळे सर्वच मुलामुलींना तपोवनातून हलहवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या बालगृहांमध्ये पटावर १२२ मुली आणि ६७ मुले वास्तव्यास आहेत. जी मुले वयाच्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत आणि ज्यांचे पालकत्त्व स्वीकारायला कूणी तयार नाही अशा मुला मुलींना बालगृहात प्रवेश दिला जातो. केअर अ‍ॅन्ड प्रोटेक्शन कायद्यांतर्गत या मुला-मुलींचे तेथे निकोपणे संगोपन केले जाते. त्यांच्या मानसिक वाढीची विशेषत्त्वाने काळजी घेतली जाते. त्यांच्या देखरेखीची आणि सुरक्षेची जबाबदारी वसतीगृहाची असते. सर्व कारभार नियमसंगरित्या सुरू आहे की नाही हे बघण्यासाठी बालकल्याण समितीची नियुक्ती केली जाते. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारऱ्याच्या श्रेणीचे अधिकार बहाल असलेल्या या समितीच्या आदेशाला वसतीगृह बाध्य असते.
तपोवनच्याा बालगृहात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची एकएमागून एक प्रकरणे बाहेर येऊ लागल्यानंतर बाल कल्याण समिती सक्रीय झाली आहे. इतके सगळे घडून गेले नि बालकल्याय समिती अनभिज्ञ राहिली याची बोचही समितीला आहेच. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात मुलींच्या आयुष्याशी खेळ होऊ नये यासाठी बालकल्याण समितीने विचारमंथन सुरू केले आहे. तपोवनमध्ये घडलेल्या प्रकारांची यादी बघता हे स्था मुलींसाठी मुहीच सुरक्षित नाही, अशा प्रथमिक निष्कर्षाप्रत समिती आली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या निर्णयावर अधिकृतपणे शिक्कामेर्तब व्हायचे असले तरी लवकरच हा निर्णरु अुमलात आणण्याची शक्यता आहे. असा निर्णय झाल्या तपोवनातील सर्व मुली इतर बालगृहांमध्ये हलविल्या जातील. मुली हलपिल्यास मुलेही हलविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपोवनच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्याच्या दिशेने सुरू झालेला हा विचार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. ज्याच्या शिरावर मुलामुलींच्या संगोपनाची, देखरेखीची आणि सुरक्षेची जबाबदारी होती त्या अधीक्षक गजानन चुटे यानेच मुलींवरील अत्याचाराला बळ दिले, अशी खात्री पअल्याने पोलीसांनी त्याला अटक केली होती. मुलींचे लगिक शोषण करणाऱ्यांमध्ये तपोवनातील कर्मचारी सहभागी असल्यामुळे मुली कुणाच्या भरवशावर ठेवायचा असा मोठा प्रश्न समितीला पडला आहे. मुलांचे शोषण झाले असल्याची एकही तक्रार अद्याप पुढे आली नसली तरी अशा वातावरणात मुलांवर काय संस्कार पडतील याचीही काळजी बाल कल्याण समितीला वाहायची आहे. समितीचा कारभार निकोप आएि पारदर्शी असल्याचे सिद्ध करण्यासाठी आता समितीने कठोर निर्णरु घेणेदेखील आवश्यक ठरते. निर्णयबाबत जाणून घेण्यासाठी समितीेचे अध्यक्ष दिलीप काळे यांना संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Will move girls in Tapovan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.