शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट 'पाना'ने कसायचे आहे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 10:58 IST

Amravati : देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर खरमरीत टीका, रवी राणा यांच्या प्रचारार्थ सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा हे भाजपचे मित्रपक्ष असून त्यांची विकासात्मक कामे फार मोठी आहेत. खरे तर त्यांना मतदारसंघात प्रचार करण्याची गरजच नाही. कारण त्यांचे निवडणूक चिन्ह 'पाना' आहे, याच पान्याने येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट कसायचे आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली. 

महायुतीचे घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेरा मतदारसंघाचे उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ जाहीरसभेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर आमदार रवी राणा, खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, गुजरात राज्याचे कॅबिनेट मंत्री ऋषिकेश पटेल, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी, प्रभुदास भिलावेकर, डॉ. गणेश खारकर, युवा स्वाभिमानचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठ कात्रे, किरण पातुरकर, माजी महापौर किरण महल्ले, चरणदास इंगोले, गणेशदास गायकवाड, जयंतराव देशमुख, आत्माराम पटेल संजय हिंगासपुरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात महायुती सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेत योजना सुरू केल्या आहेत. पण विरोधक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले परंतु उच्च न्यायालयानेही महाविकास आघाडीचे हे षडयंत्र हाणून पाडले. त्यामुळे लोकहित कोणते सरकार जोपासते, याची जाणीव जनतेला झाली आहे. येत्या काळात सरकार आल्यास लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जातील, त्याकरिता आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजपला १५२ जागा मिळाल्या. त्यापैकी ४ जागा इतर पक्षांना देण्यात आल्या असून त्यापैकी बडनेरा ही एक आहे. रवी राणा त्यांचं बोधचिन्ह पाना आहे. ते कोणाकोणाचे नट कसतील माहीत नाही आम्हालादेखील विरोधकांच्या डोक्याचे नट कसायचे आहे, त्यासाठी तुमच्या पान्याची आवश्यकता पडेल, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

मुलीच्या शिक्षणाची चिंता करू नका; मुलींचे मामा मुंबईला आहेतआमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात की, तुम्ही घरी बसा. मी तालुक्याला जिल्ह्याला जाऊन येते. तुम्ही जास्त पैसे खर्च कराल. दारू प्याल, असं सांगत सर्वात जास्त महिला अर्ध्या तिकीटमध्ये प्रवास करत आहे. महायुती सरकारने मुलींच्या शिक्षणाची सोय करून ठेवली आहे. लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, मुलींचे मामा मुंबईला बसून आहे. त्यांनी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत भाचीच्या शिक्षणाची सोय करून ठेवल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महिलांना दिली.

फडणवीसांमुळेच बडनेरात विकासाची गंगाजळी : रवी राणाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच बडनेरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आले असून येथे १०० प्रवेश निश्चित झाले आहे. १६०० कोटींतून ही ऐतिहासिक वास्तू नावारूपास येणार आहे. मेडिकल कॉलेज परिसरात येत्या काळात ४ ते ५ हजार लोकांना रोजगार मिळेल. बडनेरात ४५० कोटींतून रेल्वे बैंगन कारखाना, बडनेरा-अमरावती सिमेंट काँक्रिटीकरण मार्ग १९० कोटी, सांस्कृतिक भवन, उद्यान यासह अंजनगाव बारी आणि भातकुली तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. भातकुली येथे ७ कोटींतून तहसील कार्यालय, खोलापुरी गेट पोलिस ठाणे साकारले जात असून यासह अनेक विकासाची कामे मतदारसंघात झाल्याची माहिती रवी राणा यांनी दिली.

रवी भाऊ म्हणून मी तुमचा पाना मागितला? महायुती सरकारला बदनाम करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न बंद झाले, तर विरोधक उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयानेही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे खडसावून सांगितले. म्हणून रवी राणा आता तुमचा पाना द्या, या महाविकास आघाडी विरोधकांच्या डोक्याचे नट कसण्यासाठी द्या, असे म्हणत ना. देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढविला.

आमचा एकच धर्म आहे महायुतीचा धर्म : देवेंद्र फडणवीस भाजपने महायुतीचा जो उमेदवार दिला आहे त्याच्या मागे उभे राहायचे आहे. बडनेरात रवी राणा, तर अमरावतीमध्ये सुलभा खोडके यांच्या मागे भाजपा उभी आहे. आमचा एकच धर्म आहे महायुतीचा धर्म तो प्रामाणिकपणे पाळायचा आहे, असे संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर उमेदवारांना समर्थन करणारे भाजपचे पदाधिकारी, कार्यकत्यांचे कान टोचल्याचे दिसून आले

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmravatiअमरावतीBJPभाजपा