शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयात बनावट औषध पुरवठादारांच्या मुसक्या आवळण्यासाठी तब्बल तीन महिने का घेतले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:59 IST

'त्या' बनावट औषधी पुरवठादारांची उडाली भंबेरी : जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या कारवाईकडे लागल्या नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरोग्य सेवा आयुक्तालयाने शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या एजन्सी आणि पुरवठादारांची नावे जाहीर केली असून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, असे पत्र ३ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर बनावट औषधी पुरवठादारांसह एजन्सींवर कार्यवाही होणार असल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे.

शासकीय रुग्णालयात बनावट औषध पुरवठा होत असल्याचा विषय हा ४ जुलै पासून पुढे आला. अन्न व औषध प्रशासनाने ही बाब निदर्शनास आणली होती. तसे पत्र 'एफडीए' आयुक्तांनी आरोग्य संचालकांना पाठविले होते. मात्र, आरोग्य विभागाने बनावट औषध पुरवठादारांच्या मुसक्या आवळण्यासाठी तब्बल तीन महिने का घेतले? हा संशोधनाचा विषय आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, लेबल वेगळे आणि औषधांचे मूळ घटक नव्हते. तरीही जिल्हास्तरावर ते औषध का खरेदी केले, हे देखील महत्त्वाचे आहे. एकंदरीत औषधी खरेदीत दलालांची साखळी असून यात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि औषध भांडारप्रमुखही तितकेच जबाबदार मानले जात आहेत. आता आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या निर्देशानुसार, बनावट औषध पुरवठादारांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे नजरा लागल्या आहेत.

उच्च न्यायालयातून दिलासा

अमरावती येथील ग्लेशिअर फार्मासिटिकल आणि राजेश फार्मा यांच्यावर बनावट औषध पुरवठा केल्याप्रकरणी एफडीए आयुक्तांनी ७ जुलै २०२५ रोजी त्यांचे परवाने रद्द केले होते. मात्र, ग्लेशिअर आणि राजेश फार्मा यांनी नागपूर खंडपीठात रिट पिटीशन याचिका क्रमांक ३३८०/२०२५ नुसार न्यायासाठी धाव घेतली होती. दरम्यान, न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी युक्तिवादानंतर १६ जुलै २०२५ रोजी हे दोन्ही परवाने रद्दचा निर्णय स्थगित केला.

"गतवर्षी ग्लेशिअर आणि राजेश फार्मा या दोन्ही पुरवठादारांच्या औषधांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविले होते. योग्य अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, इतर ठिकाणी ते औषध पुरवठा करीत असतील तर याविषयी माहिती नाही."- डॉ. सुरेश असोले, डीएचओ, अमरावती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delay in Cracking Down on Fake Drug Suppliers Questioned

Web Summary : Authorities are investigating delays in acting against fake drug suppliers in government hospitals. The FDA flagged the issue months ago, raising concerns about potential collusion involving officials and suppliers. Action is now expected following directives from higher authorities, with scrutiny on past purchases.
टॅग्स :nagpurनागपूरmedicinesऔषधं