बंडखोरीचे वादळ नेमके रोखेल कोण? काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई: महानगरात एकही भाजप आमदार नाही!
By गणेश वासनिक | Updated: December 18, 2025 09:56 IST2025-12-18T09:55:44+5:302025-12-18T09:56:39+5:30
मित्रपक्षांच्या आमदारांचे 'गुडबुक' कार्यकर्ते स्टैंड करण्याची रणनीती

बंडखोरीचे वादळ नेमके रोखेल कोण? काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई: महानगरात एकही भाजप आमदार नाही!
गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तब्बल तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अमरावती महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच भाजपात उमेदवारीसाठी भाऊगर्दी आहे. 'इनकमिंग' वाढल्याने तिकीट कुणाला, हा मोठा पेच नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. भाजपने '५५ प्लस' ही रणनीती आखली असली तरी प्रथम बंडखोरी रोखण्यासाठी कस लागणार आहे.
शिंदेसेना, आमदार रवी राणा यांचा स्वाभिमान पक्षदेखील युतीत सहभागी होत असल्याने या मित्रपक्षांसाठी आपसूकच जागा सोडाव्या लागतील. अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके, तर बडनेराचे आमदार युवा स्वाभिमानचे रवी राणा हे आहेत. हे दोन्ही आमदार महायुती सरकारमध्ये सामील आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वेगळी चूल मांडणार आहे. खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसची धुरा सांभाळतील.
एकूण प्रभाग किती आहेत? - २२
एकूण सदस्य संख्या किती? - ८७
कोणते मुद्दे निर्णायक ?
१. अमरावती रेल्वे ब्रिज सर्व १ प्रकारच्या वाहतुकीसाठी गत चार महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अमरावतीकरांची दरदिवशी होणारी वाहतूक कोंडी आणि सर्वसामान्यांची गैरसोय.
२. प्रशासक काळात अनावश्यक निधीचा खर्च, नियमबाह्य स्वच्छता कंत्राट यासह अमरावतीत रखडलेले विविध प्रकल्प, शहरात सीसीटीव्हीचा अभाव.
३ . अमरावती स्मार्ट सिटी, भुयारी गटार योजना रखडली. उद्याने, बगीचे ओसाड आहेत.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
भाजप - ४५
काँग्रेस - १५
शिवसेना - ०७
एमआयएम - १०
बसपा - ०५
इतर - ०५
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती?
एकूण -५,७२,२८९
पुरुष - ३,१०,१७५
महिला - २,६२,०७९
इतर - ३५
आता एकूण किती मतदार?
एकूण - ६,७७,१८०
पुरुष - ३,३९,१७७
महिला - ३,३७,९३५
इतर - ६८
अमरावती महापालिकेत १ लाख ४ हजार ८११ नवमतदार वाढले आहेत. विकास, रोजगार आणि पायाभूत सुविधा देणाऱ्या पक्षाच्या बाजूने मतदान करतील, असे संकेत आहेत.