वीज चोरीला रोखणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:08 IST2017-08-12T23:08:19+5:302017-08-12T23:08:55+5:30

वीज चोरीला रोखणार कोण?
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : शहरातील उदय कॉलनी परिसरातील वस्तीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या मुख्य वाहिनीवरून अवैध वीजजोडणी घेतल्यामुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
नागरिकांना दैनंदिन जीवनात विजेचा वापर अति आवश्यक झाला आहे. त्यातही विजेचा वापर करून ही एक रूपयाही भरणा न करावा लागत असल्यामुळे उदय कॉलनीतील अनेक नागरिकांचे वीज चोरी करण्याचे प्रकार वाढतच चालले आहे. ना कोणाचा धाक ना कोणाची भीती अन् मोफत वीज मिळत असेल तर मीटर घेवून ज्यादा देयके का भरावी असे चित्र सद्या तालुक्यात वीज चोरीचे प्रकार समोर येत आहे. खुलेआम मुख्य रस्त्यावरील विद्युत तारांवर आकोडे टाकून निरंतर वीज चोरीकडे विद्युत वितरण विभागाच्या अधिकाºयांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत.
यासोबतच उघड्या डीपी व खुले कनेक्शन हे तालुक्यातील भयावह चित्र निर्माण झाले आहे. नुकत्याच एका शेतकºयाच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. तसेच घराला लागूनच या विद्युत वाहिन्या गेल्याने वर्षभरात १० ते १२ घटना तालुक्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे या वीजचोरी व जिवीतहानीला जबाबदार कोण, असा प्रश्न यावरून उपस्थित होत आहे.
कृषी कामाकरिता असलेली वीज जोडणीचा व्यावसायिक उपयोग घेतला जात असल्याच्या तक्रारींचा ढीग असूनही त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. शहरात वीजचोरी होत असून याकडे येथील वीज अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही भागांत वीज अधिकाºयांनी धाडी टाकून धाडसी कारवाया केल्या आहेत.
वीजचोरीप्रकरणी ६-७ जणांवर नागपूर वीज मंडळाच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर ६५ हजारांचा दंड लावला आहे. चोरी टाळयासाठी केबल लाईन टाकण्याचा चा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाºयांकडे दिला आहे.
- विपूर बन्नवरे
शहर अभियंता