शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

होम आयसोलेटेड कोरोना रुग्णांवर नियंत्रण कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 5:00 AM

गतवर्षी कोरोना संक्रमित रुग्णांस संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात होते. रुग्णाच्या निवासस्थानाचा परिसर सील केला जात होता. त्यामुळे सामान्य नागरिक त्या परिसरापासून अलिप्त राहत होते. तथापि, यावर्षी कोरोना रुग्ण आढळल्यास त्यास गृह विलगीकरणात ठेवले जाते. मात्र, परिसर सील केला जात नाही. अशा रुग्णाच्या घराच्या दारावर नगरपालिकातर्फे स्लिप लावली  जाते. संबंधित स्लिप घरावर राहील, याची शाश्वती राहत नाही.

ठळक मुद्देसंक्रमणाला सरावले नागरिक, आता नावे जाहीर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे निधन झालेल्यांची नावे प्रशासनाने जाहीर करणे आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गरजेचे ठरत आहे. प्रशासनाने या बाबीचा विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. ज्यांना फारशी लक्षणे नाहीत, त्या संक्रमित व्यक्ती होम आयसोलेटेड  अर्थात गृह विलगीकरणात राहतात. मात्र, त्यापैकी अनेक जण बरे होण्याआधीच घराबाहेर मुक्तपणे वावरतात. त्यामुळे अशांवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल उपस्थित झाला आहे. गतवर्षी कोरोना संक्रमण सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये धास्ती होती. संसर्गाचा धोका आणि त्याची भीती ओळखून कोरोना रुग्णाचे निदान झाल्यावर त्याचे नाव प्रशासनातर्फे लपविले जात होते. संबंधित रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागू नये, या कारणाने निधन झालेल्या रुग्णाचे नाव याच कारणामुळे प्रकाशित केले जात नव्हते. नावे जाहीर न करण्याचे धोरण आताही प्रशासनाकडून राबबिले जात आहे.गतवर्षी कोरोना संक्रमित रुग्णांस संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात होते. रुग्णाच्या निवासस्थानाचा परिसर सील केला जात होता. त्यामुळे सामान्य नागरिक त्या परिसरापासून अलिप्त राहत होते. तथापि, यावर्षी कोरोना रुग्ण आढळल्यास त्यास गृह विलगीकरणात ठेवले जाते. मात्र, परिसर सील केला जात नाही. अशा रुग्णाच्या घराच्या दारावर नगरपालिकातर्फे स्लिप लावली  जाते. संबंधित स्लिप घरावर राहील, याची शाश्वती राहत नाही. गृह विलगीकरणातील रुग्ण घरीच राहील, असेही नाही. अनेक रुग्ण सरसकट बाहेर फिरताना आणि लोकांमध्ये मिसळताना, दुकानातून औषध आणताना आढळून येतात. हीच परिस्थिती कोरोनाने दगावलेल्या व्यक्तींसंदर्भात पाहावयास मिळते.कुटुंबातील कोणी व्यक्ती मरण पावली, तर नातेवाईक, निधनाचे कारण न्यूमोनिया,  श्वास कमी पडून अटॅक असे सांगितले जाते. बरीच मंडळी कोरोनामुळे निधन झाल्याचे सांगत नाहीत. या दोन्ही कारणांमुळे रुग्णाच्या वा मृताच्या घरी येणारी मंडळी अनभिज्ञ राहत असल्यामुळे सहानुभूती दर्शविण्याकरिता जातात आणि  पर्यायाने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक वर्षाच्या सरावाने कोरोना आजार आता सामान्य झाला असून, रुग्णाला वा कुटुंबाला वाळीत टाकले जाण्याची भीती निरर्थक आहे. 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हवेआज प्रत्येक गावात, सर्वच मोहल्ल्यात कोरोना रुग्ण निघाल्याच्या किंवा कोरोनाने निधन झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्या गावात जाऊन तो परिसर सील करण्याची, लोकांना सतर्क करण्याची मागणी नगरसेवक नितीन उमाळे यांनी केली. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी झाल्यास अन्य लोकांना माहिती कळू शकणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या