पांढऱ्या सोन्याला झळाळी, पहिल्यांदा विक्रमी १२,२०० दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST2022-04-06T05:00:00+5:302022-04-06T05:00:50+5:30

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : देशांतर्गत उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटल्याने पांढरे सोने सध्या चांगलेच भाव खात आहे. ...

White gold shines, first record 12,200 | पांढऱ्या सोन्याला झळाळी, पहिल्यांदा विक्रमी १२,२०० दर

पांढऱ्या सोन्याला झळाळी, पहिल्यांदा विक्रमी १२,२०० दर

गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशांतर्गत उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटल्याने पांढरे सोने सध्या चांगलेच भाव खात आहे. या शेतमालाला अमरावतीत आतापर्यंतचा विक्रमी १२,२०० रुपये दर मिळाला. 
यापूर्वी सोयाबीन १० हजारांवर गेले होते. त्यानंतर, आता कापसाला सातत्याने १० हजारांवर भाव मिळत आहे. जानेवारीपासून कापसाच्या दरात सातत्याने तेजी आली आहे. गत आठवड्यात ११,४०० असा उच्चांकी भाव कापसाला मिळाला होता. त्यानंतर, आता १२ हजारांच्या पार पल्ला कापसाने गाठला आहे. 

देशांतर्गत कापसाचे उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत कमी आलेली आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने भाववाढ होत आहे, शेतकऱ्यांचा फारसा कापूस आता शिल्लक नाही. त्यामुळे आवक घटली आहे.
- नीलेश लोहाणा, कॉटन ब्रोकर

उत्पादनात कमी आल्याने वाढती मागणी, साठवणुकीचा कापूस विक्रीला

आवक घटली
साठवणुकीतील कापूस कमी असल्याने आवक कमी होत आहे. सोमवारी कापसाला ९,००० ते १२,२०० रुपये क्विंटल भाव मिळाला. मंगळवारीही हा भाव कायम होता. कापसाची मागणी वाढत असल्याने, काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली. 

बोंडसड अन् बोंडगळ
खरिपात सुरुवातीला पावसात कमी होती. मात्र, ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे कपाशीवर बुरशीजन्य रोगाचा अटॅक झाला. त्यामुळे बोंडसड व बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला. काही भागांत तर दोन ते तीन वेच्यांत उलंगवाडी झाली.

 

Web Title: White gold shines, first record 12,200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.