हृदयरोग असो वा ॲलर्जी, कोरोनाची लस घ्यायलाच हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:17+5:302021-03-13T04:22:17+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक व ज्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारखे २० प्रकारचे कोमार्बिड आजारग्रस्तांना अधिक ...

हृदयरोग असो वा ॲलर्जी, कोरोनाची लस घ्यायलाच हवी
अमरावती : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक व ज्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारखे २० प्रकारचे कोमार्बिड आजारग्रस्तांना अधिक आहे. त्यामुळे शासनाने तिसऱ्या टप्प्यात याच प्रकारातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. मात्र, याविषयीच्या गैरसमजामुळे नागरिक लसीकरणासाठी पुरेस्या प्रमाणात समोर येताना दिसत नाही. वास्तविकता ही लस पूणर्त: सुरक्षित असून कोणतेही आजार वा ॲलर्जी असल्यास नि:संकोचपणे घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक असलेल्या लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना संसर्ग काळात ज्या हेल्थ केअर वर्करनी सेवा दिली, त्यांचे लसीकरण करण्यात आले व दुसऱ्या टप्प्यात म्हणजे पुढच्या आठवड्यात फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण करण्यात येत आहे. यानंतर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील गंभीर आजारी लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झालेले आहे. यात सीरम इंस्टिट्युटची ‘कोविशिल्ड लस दिली जात आहे.
सद्यस्थितीत पहिल्या टप्यातील हेल्थ केअर वर्करचे १२,३८५, फ्रंट केअर वर्करचे १०,६६१ व ४५ वर्षावरील गंभीर आजाराचे १,५५७ व ६० वर्षांवरील १२,१९१ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आतापर्यंत ३८,४९७ व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे. हे प्रमाण ६५.३२ टक्के आहे. यात फक्त ५४ व्यक्तींना सौम्य प्रमाणात ॲलर्जी असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील ३४ केंद्रांवर ही लस देण्यात आलेली आहे. यात नऊ केंद्र खासगी असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
पाईंटर
आतापर्यंत प्राप्त डोज
कोवोशिल्ड : ७५,२००
कोव्हॅक्सिन : १४,२६०
एचसीडब्लू डोज : १२,३८५
एफएलडब्लू डोज : १०,६७१
४५ वर्षांवरील व्यक्तींना डोज : १,५५७
६० वर्षांवरील व्यक्तींना डोज : १२,१९१
कोट
सर्वच आजारांच्या व्यक्तींनी ही लस घेण्यास हरकत नाही. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. लस जर घेतली नाही तर संसर्ग होण्याची शक्यता आहे. फक्त गर्भवतींना लस देण्यात येत नाही.
- अनिल रोहणकर,
श्वसनविकारतज्ञ, जिल्हाध्यक्ष आयएमए
कोट
सर्वच प्रकारच्या आजारात ही लस घेता येते, नागिरकांनी कोणताही गैरसमज न ठेवता नि:संकोचपणेही लस घ्यावी. २० प्रकारच्या आजाराची यादी शासनाने जाहीर केली आहे. या रुग्णांनीही लस घेणे महत्त्वाचे आहे. या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास गुंतागुंत वाढते.
- अविनाश चौधरी,
किडनी विकारतज्ज्ञ
कोट
हृदयरोग असलेल्या व्यक्तीला या लसीपासून धोका नाही. किंबहुना सर्वच आजारी रुग्णांनी कोरोनाची लस घेतलीच पाहिजे. हायरिस्क आजारात जे रुग्ण मोडताच त्यांनी लस घेणे महत्त्वाचे आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित आहे.
- प्रफूल कडू,
हृदयरोगतज्ज्ञ