मजुरांचे २०० कोटींचे पेमेंट होणार केव्हा? निधीच उपलब्ध नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:09 IST2025-03-06T13:59:50+5:302025-03-06T14:09:38+5:30
'मनरेगा'ची दोन हजारांवर कामे सुरू : २९७रुपये रोजाप्रमाणे १०० दिवस कामांची हमी.

When will the payment of 200 crores to the laborers? Funds are not available
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गावपातळीवर मजुरांना गावातच काम उपलब्ध व्हावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोन हजारांवर कामे सुरू आहेत. यामध्ये डिसेंबर २०२४ पासून आतापर्यंत अकुशल कामाचे ७२.७९ कोटी, तर दोन वर्षांपासून कुशल कामांचे १२६.६३ कोटी असे २०० कोटी रुपयांचे पेमेंट झालेले नाही. त्यामुळे कामगार अडचणीत आले आहे.
केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे जॉबधारक मजुरांना प्रतिदिन २९७ रुपये याप्रमाणे १०० दिवस काम दिल्या जाते. या १०० दिवसांनंतरच्या कामाची मजुरी ही राज्य शासनाद्वारा दिले जाते. यामध्ये केंद्र शासनाद्वारा जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचे पेमेंट मजुरांना मिळाले आहे. मात्र, राज्य शासनाद्वारा १०० दिवसांवरचे पेमेंट रखडले आहे. त्यामुळे हातावर खाने असलेल्या मजुरांवर उपासमारीची पाळी आलेली आहे.
अकुशल कामांची मजुरी प्रलंबित
अचलपूर तालुक्यात २.३५ कोटी, अमरावती १.१३ कोटी, अंजनगाव सुर्जी ३१.२९ लाख, भातकुली ५१ लाख, चांदूर रेल्वे ६७.९५ लाख, चांदूर बाजार १.४ कोटी, चिखलदरा ४५.५९ कोटी, दर्यापूर ४५.५१ लाख, धामणगाव ६१.१८ लाख, धारणी ९.३३ कोटी, मोर्शी ६.६७ कोटी, नांदगाव खंडेश्वर १.३७ कोटी, तिवसा ५.१५ कोटी, तर वरुड १.३६ कोटी
'मनरेगा' द्वारे ही कामे प्रगतीत
मनरेगा योजनेद्वारे अकुशल कामांचा निधी, तर रखडला आहे. शिवाय कुशल कामांच्या बिलाचे १२६.६३ कोटी मिळाले नाहीत. यातील काही निधी दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित आहे
"निधीसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. उपलब्ध होताच त्वरित जमा करण्यात येणार आहे."
- ज्ञानेश घ्यार, उपजिल्हाधिकारी (रोहयो)