हायब्रिड ॲन्युइटीचे अर्धवट कामे केव्हा पुर्ण होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:18 IST2021-08-27T04:18:06+5:302021-08-27T04:18:06+5:30
अमरावती : जिल्ह्यात हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत ११ विविध मार्गाचे कामे करण्यात आले. मात्र, शहरातून काँक्रिटिकरणाचा रस्ता गेला. त्याची १० ...

हायब्रिड ॲन्युइटीचे अर्धवट कामे केव्हा पुर्ण होणार?
अमरावती : जिल्ह्यात हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत ११ विविध मार्गाचे कामे करण्यात आले. मात्र, शहरातून काँक्रिटिकरणाचा रस्ता गेला. त्याची १० टक्के कामे अद्यापही अर्धवट असल्याने ही कामे केव्हा पूर्ण करणार, असा सवाल केला जात आहे. दर्यापूर शहरातील बहुतांश कामे अधर्वट केल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे.
‘हायब्रिड ॲन्युइटीची सर्वाधिक कामे ही दर्यापूर तालुक्यात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नाल्याची कामे, फुटपाथ दुभाजकांची कामे तातडीने होणे अपेक्षित आहे. तहसीलजवळ रात्री दुभाजकावर कुठलेही दिशादर्शक फलक न लावल्याने येथे अपघाताची शक्यता आहे. तसेच इतर शहरातीलसुद्धा नाल्याची कामे व इतर दिशादर्शकाची कामे प्रलंबित आहे.
‘हायब्रिड ॲन्युइटीचे पॅकेज २ नुसार जिल्ह्यात ४०० किमीचे रस्ते करण्यात येत आहे. त्यापैकी ३९० किमीचे रस्ते पूर्ण झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कामाची निविदा १४६० कोटींची होती. यामध्ये अंजनगाव- दर्यापूर, मूर्तिजापूर, दर्यापूर- म्हैसांग, म्हैसांग-अकोला, अमरावती- मार्डी- कुऱ्हा - कोंडण्यपूर, अमरावती- भातकुली- आसरा, वलगाव- खोलापूर- दर्यापूर, परतवाडा- चिखलदरा- घटांग, वरूड - गव्हणकुंड -बहदा, मोर्शी - सालबर्डी, अमरावती- चांदूर रेल्वे यासह इतर असे दहा विविध मार्गांचे काम करण्यात आले. पॅकेज १ अंतर्गत ४९ किमीचा रस्ता करण्यात आला. यामध्ये ४७ किमीचे कामे पूर्ण झाली. यामध्ये अमरावती- रिंगरोड, अमरावती-कठोरा-पुसदा हा रस्ता आहे. सदर निविदा ही १७१.९२ कोटींची होती. उर्वरित कामे तातडीने करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोट
कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत. कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच ती पूर्ण होतील. ॉ
- अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग