सहायक प्राध्यापकांची भरती केव्हा ?

By Admin | Updated: July 3, 2017 00:33 IST2017-07-03T00:33:41+5:302017-07-03T00:33:41+5:30

राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत सन २०१२ ते २०१७ या कालावधीत पद निश्चितीनुसार आणि

When recruitment of assistant professors? | सहायक प्राध्यापकांची भरती केव्हा ?

सहायक प्राध्यापकांची भरती केव्हा ?

बच्चू कडूंना साकडे : नेट, सेट, पीएचडी धारकांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत सन २०१२ ते २०१७ या कालावधीत पद निश्चितीनुसार आणि त्यापूर्वी रिक्त सहायक प्राध्यापकांची पदभरती केली नाही. राज्यात ३६ हजार सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त असताना ती केव्हा भरणार, असा सवाल नेट, सेट, पीएचडीधारकांनी उपस्थित केला आहे. त्याअनुषंगाने आ.बच्चू कडू यांना निवेदन सादर करून बेरोजगार सहायक प्राध्यापकांनी कैफियत मांडली.
नेट, सेट, पीएचडीधारकांच्या मागणीनुसार, सन २०१२ते २०१७ या कालावधीत निर्माण झालेली सहायक प्राध्यापकांची संपूर्ण पदे रिक्त आहेत. शासन निणरय १ जानेवारी २०१४ नुसार २०१२ पूर्वी राज्यात ३६ हजार सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त होती. आजपर्यत ती जवळपास ४० ते ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे. नेट, सेट, पीएचडी परीक्षा लागू झाल्यापासून दरवर्षी अनेक विद्यार्थी ही पात्रता व पदवी उत्तीर्ण होत आहेत. त्यामुळे ६ वर्षांपासून उच्च शिक्षण विभागाचे सहायक प्राध्यापकांची एकही पदे न भरल्यामुळे अनेक वर्षांपासून अर्हताप्राप्त असंख्य विद्यार्थी बेरोजगार आहेत. तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांची भरती करुन नाममात्र नियुक्त्या करुन मानसिक चालवित आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांवर उपासमारीची वेळ आल्याची कैफियत आ.कडू यांच्या पुढ्यात मांडली.
या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैषणिक नुकसान झाले आहे. दरवर्षी ३ ते ४ टक्के प्राध्यापक सेवानिवृत्त होत असताना एकही सहायक प्राध्यापकांचे पद भरण्यात आले नाही. उच्च शिक्षित होण्यासाठी लागणारा कालावधी अधिक असून शेतकऱ्यांसारख्या करावयाच्या विवंचेनत आत्महत्या नेट, सेट, पीएचडी अर्हता धारकांवर आज येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे शासनाने पदनिश्चिती करुन सहायक प्राध्यापकांची पदनिश्चिती करुन रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी हिमांशू जयस्वाल, विवेक नरखेडकर, मनोज चव्हाण, जयेश तातेड, पंकज पुलाटे, चेतन शहाकार, योगेश घोडे, महेश मूगुल, मुकेश बांबोटे, स्वप्नील गोस्वावी, अमोल ठाकरे, राजेंद्र असूरकर, राहुल मनवर आदी उपस्थित होते.

Web Title: When recruitment of assistant professors?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.