१०९ कोटींची मदत केव्हा ?

By Admin | Updated: July 27, 2016 00:08 IST2016-07-27T00:08:37+5:302016-07-27T00:08:37+5:30

गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ...

When the help of Rs.99 crores? | १०९ कोटींची मदत केव्हा ?

१०९ कोटींची मदत केव्हा ?

२ लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा : पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत
गजानन मोहोड अमरावती
गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात विशेष मदत देण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतला होता. या निकषात जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ७०९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रुपयांची मदत अपेक्षित असताना शासनाने अद्याप छदामही दिलेला नाही.
गतवर्शी जिल्ह्याची पैसेवार ५० पैशांच्या आत ४३ पैसे असल्याने व याविषयी उच्च न्यायालयाची फटकार असल्याने शासनाने जिल्ह्यासह विदर्भातील ११ हजार ८३२ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र केंद्राच्या एनडिआरएफच्या नवीन निकषाप्रमाणे मदत दिली नाही. मात्र, कपाशी व सोयाबीन पीकासाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला नाही, अशांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर रकमेच्या ५० टक्के प्रमाणात मदत करण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतण्यात आला.
तालुकानिहाय शेतकऱ्यांची माहिती शासनाने २२ रोजी मागविली व याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ एप्रिल रोजी सर्व तहसीलदारांना सूचना देऊन निकषप्राप्त शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या मात्र विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकानी उशीरा दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाला अहवाल मागील आठवड्यात तयार झाला.
या अन्वये जिल्ह्यातील १९६ महसूली गावांमध्ये कपाशीसाठी दर्यापूर तालुक्यात १७११ शेतकऱ्यांनी ५९९७ हेक्टरच्या विमा काढलेला नाही तर सोयाबीनसाठी १ लाख ९५ हजार ८६१ शेतकऱ्यांनी २ लाख ३८ हजार ५१९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढलला नाही, असे एकूण १ लाख ९७ हजार ७०९ शेतकऱ्यांना २ लाख ३८ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा जाहीर झालेल्या ५० टक्के प्रमाणात म्हणजेच १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली असली तर शासनाने अद्यापपर्यत विशेष मदत दिलेली नाही.

असा आहे विशेष मदतीचा शासनादेश
अमरावती, नागपूर, औरंगाबाद व नाशिक विभागातील कापूस पीक तसेच अमरावती, नागपूर विभागातील सोयाबीन पिकांसाठी पिके विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात रक्कम शासन शेतकऱ्यांना देईल.

कपाशीसाठी ३९ लाखांची मागणी
दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात कपाशीसाठी पीक विमा विशेष मदत देण्यात येणार आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यातील १ हजार ७११ शेतक्यांना ३१ लाख ५७ हजार ५३६ व चिखलदरा तालुक्यातील १३७ शेतकऱ्यांना ७ लाख ८६ हजार ६४४ रुपयांची अशी एकूण १ हजार ८४८ शेतकऱ्यांना ३९ लाख ४४ हजार १८१ रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा आहे.

९० हजार शेतकऱ्यांना पीक विमा
जिल्ह्यात खरीप २०१५ या हंगामासाठी कपाशी व सोयाबीनसाठी ९१ हजार १४३ शेतकऱ्यांना ८२ कोटी २९ लाख ५ हजार ७९२ रुपयांचा पीक विमा जाहीर झाला आहे. यामध्ये कपाशीसाठी ४८२ शेतकऱ्यांना ५३८ हेक्टरसाठी ५ लाख ९२ हजार ७४७ रुपयेतर सोयाबीनसाठी ८० हजार १८६ शेतकऱ्यांना ९० हजार ६९५ हेक्टरसाठी ८२ कोटी २३ लाख १३ हजार ४५ रुपंयाचा विमा जाहीर करण्यात आलेला आहे.

Web Title: When the help of Rs.99 crores?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.